अनिल वीर सातारा : येथील सत्र न्यायालयाच्या समोर मुख्य परिसरात भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती किंवा अर्थकृती पुतळा स्थापन करण्यात यावा.अशी निवेदनाद्वारे मागणी प्रमुख जिल्हा,न्यायाधीश यांच्याकडे महालक्ष्मी फाऊंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी केली आहे.
सातारा सत्रन्यायालय हे भारतीय संविधान न्यायप्रविष्ट स्थान आहे.येथे प्रत्येकाला न्याय मिळत असतो.शिवाय, प्रत्येक चुकीच्या व्यक्तीला शिक्षा मिळत असते. अशा न्यायप्रविष्ट स्थान सातारा सत्रन्यायालयाच्या समोर मुख्य परिसरात संविधान निर्माते, घटनाकार, महामानव, विश्वगुरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती किंवा अर्थकृती पुतळा स्थापन करावा.अशी जिल्ह्यातील सर्व वासियांकडून मागणी होत असल्याचे शेलार यांनी सांगितले .
सध्याची परिस्थिती बघितल्या नंतर प्रत्येक व्यक्तीला कायद्याचा धाकच उरलेला नाही. ज्या महामानवांनी अतोनात कष्ट करून उच्च शिक्षण घेऊन बहुजनातील व भारतातील प्रत्येक जातीधर्मातील नागरिकांसाठी व प्राणी असो किंवा निसर्ग, झाडे, पाणी, दरे, डोंगर, हवा व अशा अनेक घटकासाठी न्याय, हक्क व अधिकार मिळावा. यासाठी हे भारतीय संविधान ज्या थोर महामानवांनी लिहिले त्यांचा मान सन्मान आदर कायमच प्रत्येकाच्या मनात व अस्तित्वात असावा. तसेच न्यायालयामध्ये येणारे सर्व सन्माननीय न्यायाधीश ऍडव्होकेट,पोलीस प्रशासन, फिर्यादी, संशयित, आरोपी, साक्षीदार व सर्व न्यायालयामध्ये येणारे व्यक्ती यांना भारतीय संविधानाची आठवण वारंवार व्हावी. तसेच कायद्यावे रक्षण व कायदा उल्लंघन, कायद्याची जाणही असावी. यासाठी सातारा सत्र न्यायालयासमोर मुख्य परिसरात संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करून सातारा जिल्हा हा गुन्हेगारी मुक्त करण्यास आम्हास सहकार्य करावे.