सातारा : शिव,फुले,शाहु, आंबेडकर आदी महापुरुष यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना रविवार दि.२९ रोजी राजर्षी शाहु सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अनिल वीर यांचे अष्टपैलू असे व्यक्तिमत्त्व आहे.ते सर्वच क्षेत्रात पारंगत आहेत.खरोखरच ते सर्वस्पर्शी,समाजशील व आपलेपणाचा ठसा उमटविणारे महामेरुच आहेत.त्यांना,”राजर्षी शाहु सन्मान पुरस्कार पुरस्कार – २०२५ चा प्रदान करण्यात येणार आहे.मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार हा राजर्षी शाहूंच्या समतावादी नगरीतील, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दिला जाणार आहे.
सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय आदी क्षेत्रातील उल्लेखनीय असे दखलपात्र कार्य पाहता वीरसर हक्काचे मानकरी आहेत.नावात काय आहे ? असे शेक्सपिअर म्हणत असले तरी महामानवांच्या नावाने मिळालेला पुरस्कार कोणालाही आकाश ठेंगणे वाटु लागेल.अनिल वीर यांनी सर्वानाच स्थान सारखेच दिले आहे.ते कोणत्याही प्रकारचा दुजाभाव करीत नाहीत.बहुजन एक होत नसल्याची त्यांची खंत आहे.जे प्रस्थापित पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर काही थेट जातात तर काही अप्रत्यक्ष सत्ताधारी यांनाच मदत होईल.अशीच व्यूहररचना करीत असतात.तेव्हा ऐक्यभाव राखणे काळाची गरज आहे.अन्यथा, आराजकतेच्या दिशेने वाटचाल चालु राहील.
अनिल वीर यांना तर विविध क्षेत्रातील आतापर्यंत ५५ इतके पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने,आझाद हिंद सेनेचे सरसेनापती सुभाषचंद्र बोस,आदर्श आंबेडकरवादी, शिवरत्न,शिवपंचगंगागौरव, समाजश्री,समाजभूषण (३ वेळा), जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार (१५ वेळा), राज्यस्तरीय शिक्षकरत्न,सर्वहारा, राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार (चारवेळा), राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार, आनंदयात्री,प्राईड ऑफ मदर इंडिया,संगोष्टी चर्चा सत्र, राष्ट्रनिर्माण,राष्ट्रीय एकात्मता, जीवनगौरव,करोना काळातील १० पुरस्कार, महायोद्धा सातारा भूषण,रयत आदी जिल्हा,राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.सन्मानिका व सन्मानपत्रासह गौरविण्यात आले आहे.नुकताच त्यांना सम्यक ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मानपत्र देऊन सन्मानीत केले आहे. याशिवाय, अनुभव फिल्म क्लब,पत्रकार संघ, धगधगती मुंबई व सुयश सामाजीक संस्थेनेही पुरस्कार देवुन सन्मानित केले आहे. याबद्धल सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.