आशा सेविकांचे थकीत मानधन तातडीने अदा करावे – स्वप्नील गायकवाड

0

७ जुलै २०२५ रोजी वाई पंचायत समितीसमोर आंदोलन

सातारा प्रतिनिधी : कोरोना काळात जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या आशा सेविकांच्या हक्कांसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविका (आशा वर्कर्स) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (National Health Mission) कार्यरत असून, त्या प्रामुख्याने ग्रामीण भागात माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. त्या गावातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करतात, आरोग्य समस्यांवर मार्गदर्शन करतात आणि आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देतात.

कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य प्रत्येकाने अनुभवले. जेव्हा माणूस माणसापासून दूर पळत होता, तेव्हा या आशा सेविका स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता समाजासाठी अहोरात्र झटत होत्या. मात्र, तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या ग्रामीण भागातील आपल्या भगिनींना गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या हक्काच्या मानधनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

एकिकडे समाज कल्याण आणि दिव्यांगांसाठी निधीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना, आशा सेविकांच्या मानधनासाठी शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याचे दिसते. त्यामुळे येत्या ८ दिवसांत आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आरोग्य विभागाविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे. दिनांक ७ जुलै २०२५ रोजी वाई पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात येणार असून, याची शासनाने नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here