फलटण प्रतिनिधी – समीर पठाण :
महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरण करण्यासाठी , तसेच महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करु शकतात , यासाठी पुरुषांनी महिलांच्या कामामध्ये लुडबुड करू नये . व सर्व महिला, भगिनींनी आपला वेगळा ठसा उमटवला यासाठी महाराष्ट्र शासनाने नवीन धोरण काढून महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे.असे असताना ग्रामपंचायत कुरवली बुद्रूक मध्ये सरपंच पति कुरवली गावची धुरा सांभाळतात . अरेरावीची भाषा वापरतात पण या वर कोणीही वरिष्ठ अधिकारी यांच्या कडे तक्रार करत नाही .समजा कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर हुकूमशाही मार्गाने त्याला शांत केले जाते . यासाठी आजतागायत सरपंच पति यांची कोणी तक्रार केली नाही . विशेष बाब म्हणजे ते रायगड जिल्ह्यातील दिघी गावी ग्रामविकास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत .तरी देखील कुरवली गावची धुरा सांभाळतात व कोणताही निर्णय घेण्यासाठी स्वताला आपण म्हणुन ती पुर्व दिशा समजतात . आता वेळ आहे की खरोखरच ही परिस्थिती बदलणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे