खा. शरद पवार यांचे हस्ते श्री विठ्ठल कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचा भुमिपुजन व शेतकरी मेळावा संपन्न
वेणुनगर-७ : श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचा नव्याने सुरु होणाऱ्या बायो सीएनजी प्रकल्पाचा भुमीपुजन कार्यक्रम व शेतकरी मेळावा रविवार दिनांक ०७.०५.२०२३ रोजी कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ नेते शरद पवार यांचे हस्ते संपन्न झाला. सदर कार्यक्रमास खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार बबनदादा शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, आमदार कैलास पाटील, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार संदिप क्षिरसागर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार धनाजीराव साठे, माजी आमदार दिपकजाबा साळुंखे, माजी आमदार श्री विनायकराव पाटील, चेअरमन राहुल शहा, बबनराव आवताडे, उत्तमराव जानकर, लतिफभाई तांबोळी, ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे, सुभाषदादा भोसले, मंगळवेढा माजी नगराध्यक्षा अरुणाताई माळी, शहराध्यक्ष संगीताताई कट्टे, साईनाथभाऊ अभंगराव, डॉ. बी. पी. शेंगेसर, श्री दिलीपबापू धोत्रे या मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी सभासद उपस्थिती होते.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील मनोगत व्यक्त करीत असतानाच अभिजीत पाटील यांनी पक्षात प्रवेश करावा असा आग्रह धरला व शरद पवारसाहेबांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून घेतला.
यावेळी बोलताना शरद पवार यांनी कै. यशवंतराव चव्हाण, कै. औदुंबर जाण्णा पाटील यांच्या बरोबर केलेल्या कामांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत कारखान्याचा इतिहास सांगत आपले भाषणाची सुरुवात केली. आपले भाषणात बोलताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेल्या उजनी धरणामुळे जिल्ह्याचा विकास होवून ऊसाचे क्षेत्र वाढलेमुळे हा जिल्हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपला श्री विठ्ठल सहकारी साखर करखान्याने पुढील गाळप हंगामात १० लाख मे. टनाचे गाळप केल्यास सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत जास्त दर देणारा कारखाना ठरेल. श्री विठ्ठल कारखान्याने साखरे बरोबरच डिस्टीलरी, सहवीज निर्मिती व नव्याने स्थापन करणेत येत असलेला बायो सीएनजी प्रकल्प या उपपदार्थाची निर्मिती केल्याने सभासदांना त्याचा फायदा होणार आहे. या कारखान्याच्या उज्वल भविष्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे. तसेच कारखाना चालविणेस सर्वतोपरी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांचे विषयी बोलताना म्हणाले की, हे नेतृत्व तुम्ही तयार केलेले आहे. त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम नेत्यांचे असते त्यामुळे मी खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना ताकद देण्याची भूमिका पार पाडीन.
सदर प्रसंगी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, हा कारखाना शेतकरी सभासदांचा राहावा व सुरळीतपणे चालावा यासाठी मी आर्थिक मदत केली व यापुढेही सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले व चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुक केले. महाराष्ट्रातील सामान्य जनता ज्यावेळी अडचणीत येते तेव्हा त्यांच्या पाठीमागे उभा राहणारे एकमेव नेते म्हणजे आदरणीय पवारसाहेब. तसेच पवारसाहेबांची काम करण्याची पध्दत कशी आहे हे त्यांनी उदाहरण देवून सांगीतले. पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयामध्ये शहराचा विकास होणे गरजेचे आहे. परंतु तेथील जनतेला विश्वासात घेवून काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी पवार साहेब यांनी पंढरपूर शहराच्या विकास आराखड्यामध्ये लक्ष देणेची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच पंढरपूर मतदार संघाची जबाबदारी माझ्यावरच भाकरी फिरविण्याची खरी गरज पंढरपूरात आहे, अशी पवार साहेबांना विनंती केली.
यावेळी श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, आपला कारखाना चालू करणेसाठी आ. रोहित पवार यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे संचालक मंडळाच्या व सभासदांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच पंढरपूर तालुक्याचे गतवैभव प्राप्त करणेसाठी हा कारखाना चालू करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व सभासदांचे आभार मानतो.

शरद पवार यांचे विषयी बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, २०१० मध्ये मी आपल्याला पहिल्यांदाच भेटलो तेंव्हापासून आपल्या व्यक्तीमत्वाचा माझ्यावर प्रभाव पडला व मी आपल्याकडे आकर्षित झालो, तसेच सदर प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, बायो सीएनजीचा प्रकल्प उभा केल्याने कारखान्यास आर्थिक फायदा होवून सर्व सभासद शेतकन्यांना जास्तीत जास्त ऊसास दर देता येईल, तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अडीअडचणी विषयी बोलताना म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये एक मोठा उद्योग निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती होवून पुणे-मुंबई येथे जाणान्या बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती होईल. तसेच कै. भारतनाना भालके यांचे स्वप्न असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या ३५ गांवचा पाणी प्रश्न आपण लक्ष घालून सोडवावा, अशी विनंती शरद पवार यांना केली. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याने पक्ष वाढीसाठी महाराष्ट्रामध्ये माझा खारीचा वाटा उचलेन अशी ग्वाही दिली.
सदर प्रसंगी खासदार सर्वश्री ओमराजे निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता उमेश पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले,
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, संचालक सबंधी संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, समाधान काळे, सचिन बाधा, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, श्रीमती कलावती महादेव खटके, सौ सविता विठ्ठल रणदिवे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोडले, धनाजी खरात, सचिन शिंदे-पाटील, तानाजी बागल, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाटगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड तसेच एम.एस.सी. बैंक प्रतिनिधी सी. एस. पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे एम. डी. श्री अमर पाटील व राजाराम सावंत, कारखान्याचे माजी संचालक, पंढरपूर व मंगळवेढा नगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचेसह कारखान्याचे सर्व सभासद अधिकारी व कर्मचारी वर्ग, श्री विठ्ठल प्रशालेचे शिक्षक व स्टाफ, डीव्हीपी उद्योग समुहचे कर्मचारी, व्यापारी व हितचिंतक पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. तर कारखान्याचे माजी संचालक श्री रायाप्पा हळणवर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.