महिला पैलवानांच्या पाठीशी सातारा येथील  विवीध पुरोगामी संघटना एकत्रीत : जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर !

0
फोटो : जीवन गलांडे यांच्याकडे निवेदन सादर करताना चंद्रकांत खंडाईत शेजारी विविध संघटनांचे प्रतिनिधी.

सातारा :  येथील विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने जंतर – मंतर नवी दिल्ली येथील महीला पैलवान यांच्या धरणा –  आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने/धरणा – आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.

               देशाची शान वाढवणारे खेळाडू आपले सर्वस्व पणाला लावुन खेळतात. त्यावेळी देशातील जनता त्यांचे कौतूकही करतात. परंतू त्याच खेळाडूंच्यावर त्याच क्षेत्रातील प्रस्थापित यंत्रणेतील व केंद्र सरकारमधील लोक सत्तेचा गैरवापर करून अन्याय करत आहेत.त्यास वाचा फोडण्यासाठी व न्याय मागण्यासाठी जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर हा फक्त त्या खेळाडूंचाच विषय रहात नाही. सर्वसामान्य महीलांना न्याय कोण देणार ? या गंभीर विषयात आता जनतेने खेेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे.तेव्हा  त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले पाहीजे. याचाच भाग म्हणून येथील विवीध संघटनांच्यावतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले.चंद्रकांत खंडाईत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्याकडे निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली. तेव्हा संबंधित निवेदन वरिष्ठ यांच्याकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास मिळाले.सदरच्या शिष्टमंडळात मिनाज सय्यद,विजय निकम, आरिफ शेख,जयंत उथळे, विजय मांडके,गणेश कारंडे,सुनील निकाळजे,अनिल वीर आदी पुरोगामी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here