तालुका अध्यक्ष पदी दैनिक लोकनामाचे अंदरसुल प्रतिनिधी हितेश दाभाडे तर उपाध्यक्ष पदी किरण ठाकरे येवला प्रतिनिधी :
येवला,विश्राम गृह येथे महाराष्ट्र पत्रकार संघाची महत्वपूर्ण आढावा बैठक आयोजीत करण्यात आली. यात,महाराष्ट्र पत्रकार संघाची येवला तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी दैनिक लोकनामाचे अंदरसुल प्रतिनिधी हितेश दाभाडे तर उपाध्यक्ष पदी किरण ठाकरे यांची निवड करण्यात आली. तालुका कार्याध्यक्ष पदी,दिपक उगले व तालुका खजिनदार पदी सचिन वखारे आणि तालुका सरचिटणीस पदी अनिज पटेल,तर संघटक पदी बाबासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच तालुका स्तरीय कामकाजा संदर्भात धोरण ठरवण्यात आले. सभासद नोंदणी करणे,विमा पॉलिसी काढणे,व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभे करणे,उत्कृष्ट पत्रकारांना सन्मानित करणे,व जिल्यातील पत्रकारांचा मेळावा आयोजीत करणे,यावर सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र पत्रकार संघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी,संपर्क प्रमुख किरण आवारे, उपजिल्हाध्यक्ष बापु चव्हाण,सरचिटणीस गजानन देशमुख, जिल्हासंघटक राजेंद्र तळेकर,जेष्ठ पत्रकार सय्यद कौसर,आयुब शाह,शब्बीर ईनामदार,दिंडोरी तालुका अध्यक्ष संदीप गुंजाळ,तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे,उपतालुका अध्यक्ष किरण ठाकरे,खजिनदार सचिन वखारे,सरचिटणीस अनिज पटेल,संघटक बाबासाहेब शिंदे,आदी महाराष्ट्र पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या वेळी बैठकीचे सूत्रसंचालन किरण ठाकरे यांनी केले तर,आभार शब्बीर ईनामदार यांनी मानले.