चिरनेर गावात धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती ऐतिहासिक थाटात साजरी

0

चिरनेर मध्ये आवतरला शिवकालीन वातावरण

उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावात काल 14 मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येथील छावा  प्रतिष्ठान चिरनेरच्या वतीने साजरी करण्यात आली. ऐतिहासिक व पारंपारीक पद्धतीने  साजरी करण्यात आलेल्या  छत्रपती शंभू राजांच्या जयंतीला शिवकालीन स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे चिरनेर गावात जणू शिवसृष्टी अवतरली होती. छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुभाष कडू यांच्या कल्पकतेतून साजर्‍या करण्यात  आलेल्या धर्मवीर शंभूराजांच्या जयंतीच्या सोहळ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. 

आरंभी छत्रपती शंभुराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल आणि भगव्या टोप्या देऊन, त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची महाआरती आणि त्यांच्या स्मृतींना ऐतिहासिक मानाचा मुजरा करून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शिवकालीन वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणी, बच्चे कंपनी आणि महिला पुरुषांमध्ये यावेळी उत्साह संचारला होता. 

छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषांनी  चिरनेर गावातील वातावरण दुमदुमून गेले होते. या मिरवणुकीत प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाबाई, महाराणी येसूबाई या महान स्त्री-पुरुषांच्या साकारलेल्या व्यक्तिरेखा दिसून येत होत्या. मिरवणुकीत अश्व नृत्याचा थरारही पाहायला मिळाला. त्याचबरोबर लेझीम पथकाची प्रात्यक्षिके यावेळी पाहायला मिळाली. सोबत हरीपाठातून संतांच्या नावाचा गजर होत होता.  त्यामुळे वारकरी या भक्तीत  तल्लीन झालेले दिसत होते.  मिरवणुकीत पुष्पवृष्टीचा वर्षाव होत होता. यात प्रामुख्याने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व नाट्य अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी देखील सहभागी झाले होती.

 रात्री रसिकांच्या मनोरंजनासाठी स्टेप आर्ट्सच्या वतीने ऐतिहासिक कार्यक्रम सादर करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानचे पदाधीकारी सचिन केणी,संतोष भोईर ,सचिन कडू,रमेश कडू,सुशिल म्हात्रे,तुषार केणी,महेश केणी,संकेत म्हात्रे,धिरज केणी,निहाल केणी,ऋषिकेश कडू,पृथ्विराज कडू,आदित्य केणी,व मित्रपरिवार तसेच हितचिंतक या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.तर श्वेता कडू,हिमानी कडू, सलोनी केणी यांनी महिला व मूलींना लेझीम साठी मार्गदर्शन केले. 

सदर छत्रपती संभाजी महाराज जन्मोसवाचे वैशिष्ठ्य:- 

 छत्रपतींची पालखी पुरुषांपेक्षा जास्त संख्येने महिला आपल्या खांद्यावर सक्षमपणे सांभाळतात. कार्यक्रमाचे उद्घाटन महिला पदाधीकार्‍यांच्या हस्ते करण्यात आले. शंभू राजांच्या मूर्तीचे पूजन वयोवृद्ध व्यक्तीच्या हस्ते पालखी मिरवणूक लेझीम पथक व हरिपाठ या माध्यमाद्वारे आयोजीत केली जाते. घोडे व विवीध प्रकारच्या वेशभूषा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here