सातारा : समाजप्रबोधन मंडळ यांच्यावतीने कासरूड,ता. महाबळेश्वर येथे महापुरुषांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अनिल वीर, बाळासाहेब अहिवळे,सरपंच संतोष जंगम, पो.पाटील अमित मोरे,रमेश कदम,मुख्याध्यापक द्राक्षे आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे होते.धम्म ध्वजारोहण ज्येष्ट कार्यकर्ते के.डी.कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. मेणबत्ती-दिपप्रज्वन अनिल वीर यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय,महापुरुषांच्या प्रतिमांना व स्तंभास पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. श्री.व सौ.रेश्मा गणपत कांबळे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.गणपत कांबळे व रविंद्र कांबळे यांनी अनुक्रमे दुपारी व रात्री भोजनदान दिले.दरम्यान,सांस्कृतीक कार्यक्रम,फनी गेम्स, जाहीर सभा आदी कार्यक्रम घेण्यात आले. मंडळाच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सचिन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
याकामी,विधिकार लक्ष्मण मोरे,अशोक कांबळे,सतीश कांबळे,बळवंत कांबळे,संपत कांबळे,मंगेश कांबळे,रमेश सकपाळ,किसन कांबळे,रुपेश कांबळे,संजय घाडगे,लक्षण घाडगे,सिद्धार्थ कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी अथक असे परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ.वैशाली वीर, अंगणवाडी सेविका सौ.पुष्पलता मोरे, मदतणीस सौ.राजश्री खांडस्कर,क्रिश कदम, नैतिक घाडगे,आयुष कांबळे,अमिश कांबळे, गणेश कदम,विठ्ठल कदम,सोनू कदम, अनिरुद्ध वीर भागू मोरे, रवींद्र कांबळे,आयुष कांबळे, आदित्य कांबळे,सम्यक कांबळे,मित कांबळे,सौ.दिपमाला बाळासाहेब अहिवळे, राजेश अहिवळे,श्री.व सौ.सुवर्णा संतोष अहिवळे – कांबळे,महेंद्र कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, युवती- महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.