आज सातारा येथे  राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलनच्यावतीने सहविचार सभेचे आयोजन

0

सातारा : राष्ट्रीय धामिनिरपेक्षाता आंदोलनाच्यावतीने  शनिवार दि.२० रोजी सायंकाळी ४ वा. येथील सुटाच्या सभागृहात, “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२०” या विषयावर  बाळासाहेब शिरसाट (माजी सभापती, जिल्हा परिषद) यांचे चौथ्या सत्रातील मार्गदर्शन होणार आहे.

   यापूर्वी, ॲड.राजेंद्र गलांडे यांनी पहिल्या सत्रात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले होते.तदनंतर अंनिसचे प्रकाश खटावकर व जेष्ठ विचारवंत जयंत उथळे यांनी अनुक्रम दुसऱ्या व तिसऱ्या सत्रातील सहविचार सभेत विचार मांडले होते.

    सदरच्या चौथ्या सत्रातील सहविचार सभेस संबंधितांनी उपस्थित रहावे. असे आवाहन भगवान अवघडे,प्रकाश खटावकर,माणिक आढाव,अनिल वीर व  सर्व सदस्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here