सातारा : जिल्ह्यासह इतरत्र ऐतिहासिक संग्रहालयातील ठेवा जतन करावा.अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन व छ. थोरले शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.तेव्हा ऐतिहासिक बाबीवर चर्चा करण्यात आली.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,माजी अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,उपाध्यक्ष ऍड.विलास वहागावकर,प्र.प्रमुख अनिल वीर, रिपब्लिकन सेनेचे गणेश कारंडे आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्यात बौद्धकालीन लेण्या आहेत.येथील छ. शिवाजी महाराज संग्रहालयात ऐतिहासिक उजाळा देणाऱ्या अनेक बाबी आहेत.राज्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संग्रहालय जुन्या गोष्टीची साक्ष देत असल्याने नव्या पिढीला ऊर्जा मिळत आहे.स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे छत्रपती थोरले शाहूराजे भोसले होत.