वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे बिरबल की खिचडी आंदोलन

0

बुलडाणा,(प्रतिनिधी)-: बुलडाणा जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे १८ मे ला करण्यात आलेले ‘बिरबलची खिचडी’ आंदोलन हटके आणि लक्षवेधी ठरले. खिचडी व उच्च शिक्षितांच्या बेरोजगारीचा ‘देखावा’ कडक उन्हातही सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला.
वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने सुशिक्षित बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी हे अभिनव आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ मे आयोजित आंदोलनात जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व बेरोजगार युवक बहुसंख्येने सहभागी झाले. सुशिक्षित ताना रोजगारासाठी मुख्य ठिकाणी भूखंड द्यावे, बेरोजगारांच्या कुटुंबातील किमान एकाला महामंडळातर्फे प्रशिक्षण व कर्ज द्यावे, बेरोजगारांच्या बँकमधील प्रलंबित कर्ज प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी प्रयोजनाकरिता असलेल्या सरकारी जागांचे भूखंडचे कायम पट्टे करून द्यावे, आर्थिक मागासलेल्या जातीसमूहातील कुटुंबांना घरकूल बांधून द्यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात बाला राऊत, विजय पवार, राहुल वानखेडे, राहुल साळवे, सागर काळे, सुनील अंभोरे, प्रकाश सरकटे, आकाश झिने, सागर गवई, रतन पवार, मुकुंदा इंगळे, प्रकाश सोनोने, समाधान पडघान, अनंता मिसाळ आदी बहूसंख्येने युवा आघाडी सहभागी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here