पैठण,दिं.२४: वाढत्या तापमानामुळे स्थलांतरित पक्षी अनेकदा पाण्या अभावी दगावतात. मात्र वेळेत त्यांची देखभाल केल्यास त्यांचे प्राण वाचवू शकतात याचे भान ठेवून अनेक पक्षी मित्र उन्हाळ्याच्या काळात छतावर अथवा खिडकीत पाणी आणि धान्य ठेवण्याचे आवाहन करत असतात. त्याला प्रतिसाद देत अनेक भारतीय पक्षांची काळजी घेत असतात. असाच एक प्रसंग पैठण येथील पक्षीमित्र प्रा संतोष गव्हाणे पाटील यांच्या अण्णपूर्णानगर परिसरातील राहत्या घरी घडला. घडले असे की आज दुपारी वाढत्या उन्हामुळे शरीरात पाणी कमी पडुन अस्वस्थ अवस्थेत मूर्च्छित पडलेला एक परदेशी पक्षी श्री गव्हाणे यांना दिसला. त्यांनी त्याला वेळेत पाणी दिले. प्रेमाने त्यास अन्न भरवले आणि बघता बघता काही वेळात पोपट पूर्वपदावर आला. काही वेळात तंदुरुस्त झालेला पक्षी आनंदाने भरारी मारत उडून गेला.
भारतीय पाळीव पोपट सांगितलं तस बोलतात किंवा वागतात. हे ऑस्ट्रेलियन पोपट प्रश्नही विचारतात. काही गोष्टी अवडल्या नाही तर त्या बोलत नाहीत किंवा प्रतिप्रश्न करतात. ककाकुवा किंवा budgerigar हे जगातील बुद्धिमान पक्षी मानले जातात, अशी माहिती श्री गव्हाणे यांनी दिली.
——-

चौकट
प्रा.संतोष गव्हाणे पाटील : कॉकटेल म्हणजे मिश्र जातीचा असल्याने यात बहुरंग पाहायला मिळतात. ते स्वतःची बुद्धी वापरतात. बजरिगर याला सामान्य पॅराकीट, शेल पॅराकीट किंवा बडगी असेही म्हणतात. हा लहान, लांब शेपटीचा, बिया खाणारा पोपट आहे. मेलोप्सिटॅकस वंशातील बडजी ही एकमेव प्रजाती आहे. बडजींना निळ्या, पांढरे, पिवळे, राखाडी आणि अगदी लहान शिळेसह रंग देऊन बंदिवासात प्रजनन केले जाते. विशेष म्हणजे यातील प्रौढ पोपटाचे वजन तीस ते चाळीस ग्राम असते आणि त्यांचे वयोमान पाच ते आठ वर्षांचे असते तर त्याची लांबी पाच ते सात इंच असते. युनायटेड स्टेट्समध्ये बडगी किंवा बजरिगर याला “पॅराकीट” म्हणून संबोधले जाते.