हर्षवर्धन जाधव याचा पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते गौरव

0

पैठण,दिं.२९.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित, कौशल्या कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद कनिष्ठ महाविद्यालयचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च २०२३ परीक्षेत विज्ञान शाखेचा विद्यार्थी हर्षवर्धन सुधीर जाधव यास विज्ञान शाखेतून ७८ टक्के गुण मिळाल्याबद्दल त्याचा राज्याचे रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . हर्षवर्धन हा पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे स्विय्यसहाय्यक(पिए) सुधीर जाधव यांचा मुलगा आहे. हर्षवर्धन याच्या यशाबद्दल मुंबई महानंदचे राज्य संचालक नंदलाल काळे पाटील,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी,जितसिंग करकोटक,राजु गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राजेंद्र बोरकर पाटील, शासकीय गुत्तेदार नितीन देशमुख, माऊली कंट्रक्शनचे बाळासाहेब डिडोरे पाटील,कौशल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश गायकवाड,जलसंपदाचे उपविभागीय अभियंता पंजाबराव बोडखे,पनवेल येथील रजिस्टर दया कदम,सुहास पाटील,माजी नगरसेवक बाळासाहेब माने,अमर शेख, विष्णू रोकडे, अभिजित कासलीवाल, पत्रकार गजानन आवारे, नितीन गि-हे, योगेश बोबडे, शेतकरी प्रशांत जगदाळे,सोनु शिंदे,जावेद शेख यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here