पैठण,दिं.१४:पैठण तालुक्यात खत बियाणे कीटकनाशक विक्रेते यांच्यावर नियंत्रणासाठी तालुका स्तरावर सह नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच भरारी पथकाची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. सदरील सनियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या तक्राची अनुषंगाने काल दिनांक 13 जून 2023 रोजी तालुकास्तरीय व विभाग स्तरीय पथकांनी पैठण तालुक्यात pachod विहामांडवा आपेगाव पैठण शहर येथे दुकानांची तपासणी केली यादरम्यान चढ्या भावाने बियाणे विक्री करणारे पाचोड येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व विशाल कृषी सेवा केंद्र तसेच विहामांडवा येथील अमृता एजन्सी व समर्थ ट्रेडर्स तसेच पैठण शहरातील प्लांटेशन ऍग्रो सर्विसेस यांचे परवाने एक वर्ष कालावधीसाठी रद्द करण्यात आलेले आहेत.
पाचोड येथील भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ कृषी पर्यवेक्षक संदीप जवणे कृषी सहाय्यक प्रमोद रोकडे कृषी सहाय्यक यशवंत चौधरी हे उपस्थित होते तसेच विहामांडवा येथे जिल्हा भरारी पथकात जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक गणेश सर्कलवाड पंचायत समिती कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील यांनी कार्यवाही केली