तालुकाध्यक्ष पदी विनोद दिलीप गोलांडे यांची निवड.
बारामती – भारतीय पत्रकार संघ (AIJ) बारामती तालुका यांची मासिक बैठक नुकतीच मुर्टी ता, बारामती येथे पार पडली . मुर्टी बाजार तळ येथे भारतीय पत्रकार संघ जेष्ठ पत्रकार मोहम्मद शेख, निखिल नाटकर ,शरद भगत यांच्या वाढदिवस व जागतिक पर्यावर औचित्य साधून मुर्टी बाजारतळ येथे उपसरपंच किरण जगदाळे व मान्यवर ग्रामस्थ यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले तर पत्रकार शरद भगत यांनी वाढदिवसानिमित्त त्या वृक्षाला संरक्षण म्हणून ट्री गार्ड स्व:खर्चानी बसवले तसेच मुर्टी ग्रामपंचायत कार्यालय मध्ये नवनिर्वाचित बाळासाहेब जगदाळे यांची नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडी बद्दल व बारामती दूध संघाच्या संचालकपदी संतोष शिंदे यांचा सत्कार अध्यक्ष काशिनाथ पिंगळे व पत्रकार विनोद गोलांडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला….
मुर्टी येथील दहावीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी सिद्धी बालगुडे ,श्रावणी मुकुंद कारंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच किरण जगदाळे यांनी मुर्टी ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार संघाचे स्वागत केले व मनोगत व्यक्त करताना त्यांनी भारतीय पत्रकार संघ नाव हे तालुक्यात आदराने घेतले जाते व सर्व पत्रकार बंधू प्रमाणिक काम करत असल्याचा उल्लेख आवर्जून केला तसेच उपसरपंच जगदाळे यांचा सत्कार सत्कार अध्यक्ष श्री काशिनाथ पिंगळे यांनी केला.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनी श्रावणी कारंडे हिने “महाराष्ट्र माझा” हे काव्य सुंदर पद्धतीत सादर केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते छबन महादेव राजपुरे, हरिदास जगदाळे उपस्थित होते.
भारतीय पत्रकार संघ हा दर महिन्यातील मासिक बैठकीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो त्यामुळे भारतीय पत्रकार संघाची तालुक्यात वेगळी ओळख आहे,
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या यासह अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नविन कार्यकारणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली.सर्वानुमते पिंगळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा विनोद गोलांडे यांच्या हाती सोपवत भारतीय पत्रकार संघ बारामती तालुका कार्यकारिणी जाहीर केली,
कार्यकारिणी खालील प्रमाणे
अध्यक्ष : विनोद दिलीप गोलांडे
उपाध्यक्ष : शंतनु सोपानराव साळवे
सचिव : सुशिलकुमार विलास अडागळे
सह सचिव : दत्तात्रय जाधव
कार्याध्यक्ष : माधव श्रीहरी झगडे
संघटक : महंमद मुसाभाई शेख
हल्ला कृती समिती : निखिल संतोष नाटकर
कोषाध्यक्ष : सोमनाथ जगन्नाथ जाधव
पदवीधर सल्लागार : संभाजी नारायण काकडे
प्रसिद्धी प्रमुख : अविनाश बाळासो बनसोडे
कायदेशीर सल्लागार : अॅड गणेश आळंदीकर
संघ प्रेस फोटोग्राफर : जितेंद्र चंद्रकांत काकडे
या प्रसंगी पिंगळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य तसेच माजी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व आभार मानले.

संघातील सर्व पत्रकार बांधवांना एकत्र घेत संघ वाढीसाठी तसेच संघामार्फत नवनविन व विविध उपक्रम राबवत,पत्रकार मित्रांना संरक्षण तसेच अडीअडचणीच्या वेळेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे स्थान जिल्ह्यात नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष विनोद गोलांडे यांनी या वेळी दिली.