राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (RMBKS) युनियन मे. इंटरनॅशनल कारगो टर्मिनल प्रा लि. मध्ये स्थापन.

0

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे ) :

मे. इंटरनॅशनल कारगो टर्मिनल प्रा लि. (ग्लोबिकॅार्न टर्मिनल) मु. कोप्रोली,  ता. उरण, जि. रायगड या कंपनीमध्ये लोकल लेबर कामगारांतर्फे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबीकेएस ) युनियनची स्थापना करण्यात आली. सदर युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन कामगार नेते  संतोषभाई घरत  (राष्ट्रीय उपाध्यक्ष( आरएमबीकेएस ) यांनी केले व कामगारांना मार्गदर्शन एन. बी. कुरणे (राष्ट्रीय महासचिव, आरएमबीकेएस ) यांनी तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांनी केले. कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे आणि कंपनी प्रशासन कामगारांना कामगार न समजता त्यांना गुलाम समझत असून त्यांना दडपणाखाली ठेवून मानसीक त्रास देत आहे. अशी कामगारांनी माहिती दिली. त्यावर शेतकरी भुमीपुत्र कामगारांवर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडल्या शिवाय राहणार नाही व कंपनी प्रशासनाच्या मुजोरीला योग्य जागा दाखविली जाईल असे संतोषभाई घरत यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले व कंपनी कामगारांवर निरनिराळे नियम लावीत असेल तर कंपनीला सुद्धा नियमांचा पालन करावा लागेल. कंपनी जाणीवपुर्वक कामगारांचा छळ करीत असेल तर त्यांना राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचा सामना करावा लागेल. असे विचार एन. बी. कुरणे (राष्ट्रीय महासचिव) यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात विनोद ठाकूर (छत्रपती क्रांती सेना, उरण अध्यक्ष), खोपटे ग्रृ. ग्रा.पं. सदस्य अच्युत ठाकूर, ग्लोबिकॅार्न युनिट अध्यक्ष जयंता म्हात्रे, उपाध्यक्ष राकेश गावंड , कार्याध्यक्ष घनलाल पाटील, खजिनदार मनोहर पाटील, मिलींद म्हात्रे, प्रितम पाटील इतर कामगार तसेच कॅान्टीनेंटल कंपनीचे युनिट अध्यक्ष सुधिर  ठाकूर, ट्रान्सइंडीया कंपनीचे युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील व जे. एम. बक्षी चे व इतर कंपन्यांचे कामगार उपस्थित होते. उद्धाटन कार्यक्रम एकदम उत्साहात पार पाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here