पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी) :श्री क्षेञ पैठण मार्फत वारक-यांना मोफत चहा व पाणी सेवा संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करना-या वारक-यांना श्री क्षेञ पैठण मार्फत मागील २३ वर्षापासुन अॕड. फटांगडे मामा यांचे मार्फत मोफत चहा, पाणी व बिस्कीट सेवा पुरवली जात आहे.
२३ वर्षापुर्वि र्अॕड किसनराव फटांगडे मामा हे स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सोबत आळंदि ते पंढरपूर पायी वारी करत असतांना त्यानी अनुभवले की लाखो वारकर्यांना पाऊस व ऊन, वारा व अशुद्ध पाण्यामुळे सर्दि, पडसे, खोकला, अंगदुखी, ताप या सारखे आजार होऊन पायीवारी अर्ध्यातच सोडावी लागते. यावर उपाय म्हनुन त्यांना कल्पना सुचली की, आपण वारकर्यांना सुंठ, दालचिनी , विलायची, जायफळ, मीरी, वापरुन आर्युवेदिक चहा बनवुन उपलब्ध करुन दिला व शुध्द पीण्याचे पाणी दिले तर वारकर्यांना त्याचा फायदा होईन व वारी अर्ध्यातच सोडन्याची वेळ येनार नाही. या कल्पनेचे रूपांतर अॕड. फटांगडे मामा यांनी सत्यात उतावुन मागील २३ वर्षापासुन हि सेवा निरंतर आज तागायत चालु आहे.
यासाठी साखर १० क्विंटल, चहा पत्ती २५ कीलो, दुध ५०० लीटर (अमोल गोल्ड टेट्रा ), सुठं ३ कीलो, दालचिनी १ कीलो , विलायचीनी १ कीलो , जायफळ १ कीलो, मीरी १ कीलो, बिस्कीट ३५ खोके , गॕस टाकी १३, एक पाणि ट्रॕकर, एक ट्रक, १८ पुरुष सेवेकरी व ३ महिला सेवेकरी अशा संच्यासह, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करना-या वारकर्यांना श्री क्षेञ पैठण मार्फत मागील तेविस वर्षा पासुन मोफत (आर्युवेदिक) चहा, पाणी व बिस्कीट सेवा पुरवली जात आहे.
रोज साधारन ८ ते १० हजार कप चहा वारकर्यांना मोफत दिला जातो, पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्द करुन दिले जाते, ही सेवा सतत १५ दिवस दिली जाते व सदर उपक्रमास चांगला प्रतीसाद मीळत असुन वारकरी आवर्जुन व शिस्तीत रांगेत येऊन नाथ महारांजांचा प्रसाद समजुन ही सेवा स्विकारत आहे.
२१ सेवेकरी कोनताही मोबदला न घेता सेवाभावातुन ही सेवा पुरविन्यासाठी श्रमदानातुन मदत करतात. या सेवेकर्यांमध्ये प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण दशरथ खराद, जिजा (भाऊ) मीसाळ, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी , प्रगतीशील शेतकरी पांडुरंग औटे (आपेगांव), ट्रक चालक मीयाभाई सय्यद, कैलास परदेशी , व्यापारी हरीभाऊ तुपे, विजय सारडा, शिवाजी सारडा, पाणी ट्रंकर चालक अप्पासाहेब दळवे, कीशोर भुजबळ, कृष्णा गरड, मच्छींद्र गलधर, विजय परदेशी, संजय जाधव, डीगांबर कनसे, संतोष आप्पा ढेरे, मच्छिंद्र गोरे तसेच महिला सेवेकरी गोदाबाई जामदार , कुसुमबाई एरंडे, शकुंतला जाधव यांचा समावेश आहे.
या उपक्रमासाठी जे सेवेकरी आहेत ते शासकीय नोकर , व्यापारी , प्रगशील शेतकरी, शेतमजुर आहेत. हे सर्वजन प्रतिवर्षी १५ दिवस सुट्टी टाकुन, व्यापार सोडुन, मजुरी बुडवून स्वकाम सेवा करत आहेत. विशेष या अभीनव उपक्रमास लागनारा सर्व खर्च अॕड. किसनराव फटांगडे मामा हे स्वतः करतात, यासाठी कुनाकडुनही कुठलीही देनगी, दान स्वीकारले जात नाही .
या उपक्रमास .नामदार संदिपान पाटील भुमरे कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्यासह स्थानिक अधिकारी व पदाधिकारी, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समीती सदस्य, भालदार चोपदार व वारकऱ्यांनी भेट देऊन मोफत चहा व पाणी सेवेची प्रशंसा केली. ह्या सर्व उपक्रमचे क्षेय स्वत: न घेता, माऊली आमचे कडुन ही सेवा करुन घेत आहे, असे मनोगत अॕड. (अध्यक्ष) किसनराव फटांगडे मामा यांनी व्यक्त केले . सदर उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी दशरथ खराद, जिजाभाऊ मीसाळ, पाडुरंग औटे, हरीभाऊ तुपे नामदेव गवळी , कैलास परदेशी हे विशेष परिश्रम घेतात.