आई वडीलांचे छत्र हरवलेल्या शालेय विद्यार्थिनीस गणवेश व शालेय साहित्य भेट-

0


सरपंच सौ. सुरेखाताईं रेवगडे यांचे दातृत्व

सिन्नर : आमचे पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील कु. वसुंधरा राजाराम अगिवले या विद्यार्थिनीचे मातृ -पितृ छत्र हरपलेले आहे पाडळी गावच्या सरपंच सौ. सुरेखाताई सुधीर रेवगडे यांच्या मनात सतत खंत होती. या गोष्टीचे औचित्य साधून त्यांनी तिचे पालकत्व स्वीकारून उदात्त हेतूच्या भावनेने तिची शालेय गरज म्हणजे शालेय गणवेश तिला भेट देऊ केला.आमच्या विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नेहमी त्या वेगवेगळ्या शालेय देणगी स्वरूपात भेटवस्तू देऊन उपकृत करत असतात. सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या पाडळी गावच्या प्रथम नागरिक सुरेखाताई यांनी विविध संस्थेच्या रूपातून, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून व स्वतःच्या मदतीने आजपर्यंत शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. या त्यांच्या कार्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक व बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी श्री.एस. बी. देशमुख यांनी त्यांच्या या मदतीबद्दल ऋण व्यक्त करून आमच्या विद्यालयावर सतत आपण सामाजिक भावनेतून प्रेम व्यक्त करावे व विद्यालयातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात सतत असाच पुढे ठेवून विद्यार्थ्यांच्या या ज्ञानरूपी कार्यास आपली मदत मिळावी ही सदिच्छा व्यक्त केली. यावेळी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.टी. के. रेवगडे, बी.आर.चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी.गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के.डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे,आर. एस. ढोली, ए. बी थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here