समृद्धी महामार्गावर झालेला अपघात अतिशय दुर्दैवी : मुख्यमंत्री शिंदे

0

समृद्धी महामार्गावर अपघात स्थळाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट

बुलडाणा :समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा हद्दीत काल मध्यरात्री झालेल्या खाजगी बस अपघाताच्या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली.

समृद्धी महामार्गावर झालेला हा अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या अपघाताची भीषणता मोठी आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. उपलब्ध यंत्रणा, पोलीस प्रशासन त्यांच्यामार्फत तात्काळ मदत पोहोचली. मात्र स्लीपर कोच बसचा मुख्य दरवाजा बंद असल्याने दुर्दैवाने अनेकांना वाचवता आले नाही. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा तज्ज्ञांकडून अभ्यास केला जाईल, त्यावर उपाययोजना करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

बसचा अपघात टायर फूटून नाही तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने!

बसचा अपघात टायर फूटून नाही तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असल्याचा अहवाल अमरावती परिवहन विभागाने दिली आहे.

समृध्दी महामार्गावर होणाऱे अपघात रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून अभ्यास करून लवकरच अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here