देवळाली प्रवरा / प्रतिनिधी.
संगमनेर ते राहुरी असा बसमध्ये प्रवास करीत असताना दोन महिलांनी एका महिलेला धक्काबुक्की करून तिच्या जवळील सुमारे अडीच तोळे सोन्याचे दागिने व ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडलीय.
अनिता यशवंत कडु, वय ३८ वर्षे, रा. चानजे डावुर नगर, उरण चारफाटा, तालुका उरण, जि. रायगड. ह्या त्यांच्या नातेवाईकां बरोबर नाशिक येथून राहुरीकडे बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. ८७४६ या बसमधून प्रवास करीत होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व ५ हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या पर्समध्ये ठेवले होते.त्यानंतर दुपारी ४ वाजे दरम्यान देवळाली चौक राहुरी फक्टरी येथे अनिता कडू ह्या बसमधुन खाली उतरत असताना दोन महिलांनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांच्या पर्स मधील ५७ हजार रुपए किंमतीचे सुमारे अडिच तोळे सोन्याचे दागीने व ५ हजार रुपए रोख रक्कम असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला. त्यानंतर अनिता कडू ह्या त्यांच्या नातेवाईकांसह बसमधून उतरून राहुरी फॅक्टरी येथील दिनेश गुरु यांच्या घरी गेल्या. तेथे गेल्यावर पर्समधील मनी मंगळसूत्र, डोरले, सोन्याची अंगठी व रोख रक्कम चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिता यशवंत कडू यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी महिलांवर गुन्हा रजि. नं. ६८९/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.