झाडाचे खोड रस्त्यावर आडवे का टाकले विचारल्याचे रागातून मारहाण

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी  

         झाडाचे खोड रस्त्यावर आडवे का टाकले असे विचारण्याचा राग आल्याने नवनाथ दांगट व त्यांच्या कुटुंबीयांना आठ जणांनी मिळून लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील कात्रड येथे घडलीय. 

नवनाथ बबन दांगट, वय २७ वर्षे, हे कुटूंबासह राहुरी तालूक्यातील कात्रड येथे राहत असून संतोष अशोक दांगट हा तेथेच गावात राहणारा आहे. दोघांमध्ये शेती गट नं. ४३७ मध्ये जाणारे रस्त्यावरुन वाद आहे. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास नवनाथ दांगट, बबन दांगट, लता दांगट, सुप्रिया दांगट, तसेच त्यांची आत्या अनुसया हे ट्रॅक्टरमधून जात होते. 

तेव्हा संतोष अशोक दागंट याने रस्त्यावर खोड आडवे लावलेले होते. त्यामुळे नवनाथ दांगट यांनी संतोष यास रस्त्यात खोड आडवे का लावले? असे विचारले. त्याचा राग आल्याने आरोपींनी नवनाथ बबन दांगट व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून लोखंडी राॅड, लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. 

या घटनेत नवनाथ दांगट यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन गहाळ झाली. घटनेनंतर नवनाथ बबन दांगट यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी संतोष अशोक दागंट, अशोक कारभारी दांगट, मारुती गंगाधर दांगट, विठ्ठल कारभारी दांगट, विजय अर्जुन दांगट, विकास सुदाम दांगट, पुष्पा विठ्ठल दांगट, सुशिला अशोक दांगट सर्व रा. कात्रड, ता. राहुरी. 

या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. ६९१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे शिवीगाळ, मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here