पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम :
रणसिंगवाडी तालुका खटाव येथे भाजपा बूथ सशक्तिकरण अभियान अंतर्गत डॉ सौ.प्रियाताई महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत भाजपचे जिल्हा सरचिटणीस भरतजी आप्पा मुळे ,बुधगावचे सरपंच अभय राजेघाटगे ,पुसेगावचे उपसरपंच पृथ्वी( बाबा) जाधव ,अविनाश रणसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर प्रियाताई शिंदे म्हणाल्या रणसिंगवाडी येथील विविध विकास कामांचा आढावा या बैठकीत रणसिंगवाडी येथील जिहे कठापुर उपसा जलसिंचन योजना येथे कशी कार्यान्वित करावी याबाबत चर्चा झाली. यावेळी महिला बचत गटांना प्रोत्साहन चर्चा करण्यात आली. व बुध रणसिंगवाडी रस्त्यावर पिकअप शेड मुक्कामी एसटी बस सुरू करण्यात यावी याबाबत चर्चा झाली .व रणसिंगवाडीच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण कटिबद्ध असल्याच डॉ प्रियाताई शिंदे यांनी सांगितले . यावेळी राहुल फडतरे ,अनिकेत फडतरे ,रवि जाधव, अजित रणसिंग, अजित पाटील ,अनिल पाटील, किसन फडतरे, बबन पोतेकर, अंकुश शिंदे ,सोमनाथ फडतरे, शशिकांत शिंदे ,सदाशिव मसुगडे ,सुरेश मसुगडे, हनुमंत जाधव ,मानसिंग मसुगडे व गावातील महिला व विविध मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार माजी सरपंच अविनाश रणसिंग यांनी मानले.