सौ .सविता शांताराम देशमुख – 9511769689*
_
दिनांक :~ 05 जुलै 2023 ❂*_
वार – बुधवार
_* आजचे पंचाग
*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
*आषाढ. 05 जुलै*
*तिथी : कृ. द्वितीया (बुध)*
*नक्षत्र : श्रवण,*
*योग :- प्रीती*
*करण : वनिज*
*सूर्योदय : 05:52, सूर्यास्त : 07:07,*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सुविचार *_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*क्रोध हा ज्याच्यावर आलाय त्यापेक्षा ज्याला आलाय त्याची जास्त हानी करतो….*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*म्हणी व अर्थ
*_
*“असंगासी संग आणि प्राणाशी गाठ*
_*अर्थ:-*_
*दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.”*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* दिनविशेष *_
_*या वर्षातील 186 वा दिवस आहे.*_
*राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार)*
*‘आझाद हिंद सेने’चा आज स्थापनादिन*
_* महत्त्वाच्या घटना*_
*”१९७५: ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.*
*१९९६: संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर*
*१९९७: स्वित्झर्लंडच्या अवघ्या १६ वर्षाच्या मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकाच्या याना नोव्होत्नाला पराभूत करुन सर्वात लहान वयात विंबल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली. हे तिच्या कारकिर्दितील दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद होते.*
*१९९८: भारतीय लष्कर दलाने स्वदेश निर्मित रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.*
*१९९९: संयुक्त राष्ट्र अमेरिकेने तालिबान राष्ट्रावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली.*
*२००४: FRBM कायदा २००३ अमलात.*
*२००४: इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.*
*२००९: अँडी रॉडीकला विम्बल्डनमधे पराभूत करुन रॉजर फेडररने विक्रमी १५ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले.*
*२०१२: ३१० मीटर (१०२० फूट) उंचीसह लंडनमधील द शर्ड ही युरोपमधील सर्वात उंच इमारत ठरली.*
*२०१७: राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.*
_*जन्मदिवस / जयंती*_
“१८८२: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२७)*
*१९१८: के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)*
*१९२०: आनंद साधले – संस्कृत वाङ्मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक (मृत्यू: ४ एप्रिल १९९६)*
*१९२५: नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल (मृत्यू: ८ आक्टोबर २०१२)*
*१९४६: राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष (मृत्यू: ८ ऑक्टोबर २०२०)*
*१९५२: रेणू सलुजा – ’परिंदा’, ’धारावी, ’सरदार’ आणि ’गॉडमदर’ इ. चित्रपटांच्या संकलनासाठी चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक (मृत्यू: १६ ऑगस्ट २००० –* मुंबई)
*१९५४: जॉन राईट – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू व प्रशिक्षक*
*१९६८: युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वॉजिकी यांचा जन्म.*
*१९९५: पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक बॅडमिंटनपटू पुसरला वेंकट सिंधु उर्फ पी. वी. सिंधु यांचा जन्मदिन.”*
_*मृत्यू / पुण्यतिथी
*_
*”१८२६: सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी (जन्म: ६ जुलै १७८१)*
*१८३३: जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे निकेफोरे निओपे यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १७६५)*
*१९४५: ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान जॉन कर्टिन यांचे निधन.*
*१९५७: भारतीय वकील आणि राजकारणी अनुग्रह नारायण सिन्हा यांचे निधन. (जन्म: १८ जून १८८७)*
*१९९६: चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार (जन्म: ????)*
*२००५: बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज (जन्म: ३० ऑगस्ट १९३४)*
*२००६: भारतीय कवी आणि विद्वान थिरुल्लालु करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९२४)”*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सामान्य ज्ञान *_
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
*कोणत्या ध्वजावर पाच वेगवेगळ्या रंगाची गोल चक्र असतात?*
* ऑलिंपिक*
*सुरत येथे पहिली वखार कोणी बांधली?*
*इंग्रज*
*जगातील विस्ताराने सर्वात मोठा देश कोणता?*
* रशिया*
*मधुशाला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?*
* हरिवंशराय बच्चन*
* नेपाळ या देशाची राजधानी कोणती आहे?*
*काठमांडू*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_* बोधकथा _
_*मन सदैव शुद्ध ठेवा *_
*एक राजा आणि नगरशेठ यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. नगरशेठ चंदनाचा व्यापार करीत होता. एक दिवस नगरशेठला माहित झाले कि, लाकडाची विक्री कमी झाली आहे. हे ऐकताच शेठच्या मनात विचार आला कि राजाचा मृत्यू झाला तर त्याचे नातेवाईक चंदनाची लाकडे त्याच्याकडून खरेदी करतील. यातून त्याला नफा होईल. संध्याकाळी राजाकडे भेटायला नगरशेठ गेला. त्याला पाहून राजाच्या मनात विचार आला कि, नगरशेठने माझ्याशी मैत्री करून अपार धन मिळविले आहे. एखादा असा नियम बनविला पाहिजे कि ज्यामुळे याचे सारे धन राज्याच्या तिजोरीमध्ये जमा व्हायला पाहिजे. एक दिवस नगरशेठला राहवले नाही, त्याने राजाला विचारले, “मागील काही दिवसांपासून आपल्या मैत्रीत अंतर पडले आहे असे का?” राजाने म्हंटले, “मलाही असेच वाटते! चला नगराच्या बाहेर एक साधू राहत आहे. त्यांना याचे कारण विचारू.” दोघे साधूकडे गेले, त्यांना आपली समस्या सांगितली आणि विचारले,” आमच्या मनात एकमेकांबद्दल वाईट विचार का येत आहेत? कृपया याचे कारण सांगावे” साधू म्हणाले, “राजा आणि नगरशेठ !! तुम्ही दोघे पाहिलं शुद्ध भावनेतून भेटत होता. पण आता तुमच्या मनात वाईट विचार आले असतील ” शेठ्ला साधू म्हणाले,” तूम्ही असा का विचार केला नाही कि, राजा चंदनाच्या लाकडाची माडी बांधेल. तू राजाविषयी चुकीचा विचार केला. त्यामुळे राजाच्या बद्दल तुझ्या मनात वाईट विचार आला. तुझ्या लाकडाची तेंव्हाही विक्री होणारच होती.” राजाला साधू म्हणाले,” नगरशेठच्या धनाची तू अशा धरलीस त्यामुळे तुझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले.” त्यानंतर त्यांनी दोघांना मनातील वाईट विचार काढून टाकण्यास सांगितले. चुकीच्या विचाराने मैत्रीत अंतर वाढविले गेले असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर राजा आणि नगरशेठ दोघे परत पाहिल्यासारखे वागू लागले.*
_*तात्पर्य:-*_
*विचाराच्या पावित्र्यातुनच संबंधात गोडी निर्माण होते. मन शुद्ध असल्यास दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
_*सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.*_
मुख्याध्यापक :- पाताळेश्वर विद्यालय पाडळी, ता. सिन्नर.*_
_*सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक*_
_*समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा संस्थाचालक महामंडळ.*_