गुरुपौर्णिमेनिमित्त चिमुकल्यांनी जमवलेल्या ६ क्विंटल धान्याचे समर्पण
पैठण,दिं.४.(प्रतिनिधी) : : आ नो भद्र: क्रतवोजन्तु विश्वतो सर्व दिशांनी ज्ञान येवो त्याचा आम्ही स्वीकार करतो,असे प्रतिपादन करणारी रुद्रसुक्तातील रुचेप्रमाणे आपण जीवनात सर्व गुरूकडून ज्ञान स्वीकारण्याचा आग्रह ठेवतो.
आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरात ज्ञान देणाऱ्या विविध गुरूंना वंदन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी गुरुप्रती समर्पण भाव व्यक्त करण्यासाठी आपल्या जेवणातील एक धान्य वर्ज्य करून एक दिवसाचे धान्य शाळेत घेऊन आले ते धान्य प्रवाह अनाथालयातील विद्यार्थ्यांना समर्पित केले.याप्रसंगी जवळपास गहु चार क्विंटल , तांदुळ दोन क्विंटल, बाजरी५किलो असे एकूण सहा क्विंटल धान्य जमा झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर कुलकर्णी, प्रमुख पाहुणे प्रवाह परिवाराचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वर गोर्डे व मार्गदर्शक वर्षा पाडळकर मंचावर उपस्थित होते. गुरुपौर्णिमे विषयी मार्गदर्शन करताना वर्षा पाडळकर यांनी गुरु महिमा वर्णित करत कथेद्वारे गुरु नामदेव महाराज व विसोबा खेचर यांच्या जीवनातील प्रसंगातून गुरूंचे महत्त्व प्रतिपादन केले.तसेच रामेश्वर गोर्डे यांनी आपल्या अमोघ वाणीतून विद्यार्थी दशेत मुलांनी कसे वागावे?आपली व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवण्यासाठी ज्ञान वायू आपल्यात भरून घ्यावा व हेलियम भरलेल्या फुग्याप्रमाणे आकाशात भरारी घ्यावी व आपल्याबरोबरच आपल्या गुरूंचे नाव आपल्या वर्तनातून उंचवावे असे सांगितले.
याप्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना सरांनी शिक्षकांसहित विद्यार्थ्यांनीही आपली उंची वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली. समारोप करताना सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेतील सर्व इतर कर्मचारी यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या समारोप पारसंगी शाळेचे संचालक मंडळ उपस्थित राहून आवर्जून सर्व गुरुजन वर्गांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले त्यात शाळेचे अध्यक्ष पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय चाटूपळे व माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर मालाणी यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती.राखी धोकटे तर आभार प्रदर्शन सुदाम पोल्हारे यांनी केले.