पैठण,दिं.६.(प्रतिनिधी) : राज्याचे रोहयो तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे व रेणुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिवसेना युवानेते विलास बापु भुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त भावविश्वरत्न हभप समाधान महाराज शर्मा यांच्या अमृत वाणीतून शिवपुराण कथा श्री संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील डोम मध्ये सुरू असुन पैठण तालुक्यातून हजारो भक्त कथा ऐकण्यासाठी येत असून गुरुवारदिं.६ रोजी कथेचा दुसरा दिवस असल्याने हभप समाधान महाराज शर्मा यांनी रूद्र संहिता सती पार्वती खंड गणेश कार्तिकेय चरित्र यावर उपस्थित शिवभक्तांना प्रवचन केले त्यांच्या मधुर वाणीतून महिला व पुरुष शिवभक्त मंत्रमुग्ध झाले होते सायंकाळी सात वाजता शिवभक्त माजी उपनगराध्यक्ष शहादेव लोहारे पाटील यांनी सप्त्नीक आरती केली.
यावेळी रेणुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विलास बापु भुमरे, श्री संत एकनाथ महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे पाटील,महानंद दुध संघाचे राज्य संचालक नंदलाल काळे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णाभाऊ लबडे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, शेखर शिंदे, किशोर चौधरी, अमोल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल दोरखे पाटील, उद्योजक उमेश पाटील मुळे, नामदेव खराद, सरपंच धनंजय मोरे,दिपक मोरे, विकास मोरे,राज मानधने, जनार्दन मिटकर,शिवा पारीख, दिनेश खंडागळे, आबासाहेब गिरगे, सरपंच भाऊसाहेब पाटील गोजरे, जालिंदर अडसूळ, नगरसेवक बाळासाहेब माने, संदीप लोहारे, कैलास बोबडे, गजानन झोल सह हजारो शिवभक्त उपस्थित होते.