सातारा,
आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर त्रिपुटी येथील रघुनाथमल दरगाजी ओसवाल माध्यमिक विद्यालयाच्या 1991,1992,1993 मध्ये 8 वी , 9 वी ,10 वीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. यवतेश्वर येथील श्रीलीला या रिसॉर्ट मध्ये निसर्गरम्य वातावरणात माजी विध्यार्थी स्नेहमेळावा व शिक्षक कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिक्षिका विद्या म्हस्के ,रजनी खराडे , इंदिरा शेटे,नंदकुमार देशपांडे ,संतोष भातखंडे , राजाराम भिसे,अर्जुन शिरतोडे आदी शिक्षक उपस्थित होते .
गुरु परंपरेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम आजच्या मेळाव्याने करून दिले आहे .असे मत नंदकुमार देशपांडे यांनी व्यक्त केले. ज्या क्षेत्रात तुम्ही काम करत आहात तेथे सर्वोउत्तम काम करा असा सल्ला राजाराम भिसे यांनी दिला. मुलांना शैक्षणिक दृष्ट्या प्रगत काय देता येईल . अशी मदत करा आणि पुढील पिढी घडणाऱ्या त्यासाठी सर्वांनी शाळेकडे लक्ष द्यावे. असे मत संतोष भातखंडे यांनी व्यक्त केले . आजच्या मेळाव्याचे जसे चांगले नियोजन केले तसे आयुष्याचे नियोजन करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा .अशी सदिच्छा रजनी खराडे यांनी व्यक्त केली.
अर्जुन शिरतोडे यांनी रामरक्षा म्हणून उत्साह पूर्ण व भक्तीमय वातावरण निर्मिती केली.
माजी विद्यार्थ्यांनी आपली भावी पिढी कशी आयुष्यात यशस्वी होईल याकडे लक्ष द्यावे. असे इंदिरा शेटे यांनी सल्ला दिला
शाळा म्हणजे आम्हाला सर्वस्व वाटत होते .मुलगा आणि मुलगी ही शिकली पाहिजे. हाच ध्यास आयुष्यभर ठेवून आम्ही शिकवले .असे विद्या म्हस्के यांनी सांगितले.
यावेळी माजी सैनिक सुनील काटकर या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू दीक्षित यांनी केले .प्रास्ताविक उर्मिला अवसरे यांनी केले .
अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी जवळजवळ 30 वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आले . आभार दिपक शेडगे यांनी मानले .