पैठण :नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी तालुका पैठण येथे इयत्ता अकरावीच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25 जुलै वार मंगळवार रोजी कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी प्रा. चेतन गर्जे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे मागील 5 वर्षातील प्रगती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमाबाबत सांगितले.
तसेच सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पैठण पंचायत समितीचे केंद्रप्रमुख सुभाष शिंदे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी यशाची स्वप्ने पहावी. ती पूर्ण करण्यासाठी पुस्तके वाचावी आणि कठोर मेहनत करून यश खेचून आणावे. हे स्पष्ट केले. त्याच बरोबर कार्यक्रमास विशेष उपस्थित असलेले कौशल्य विद्यामंदिर पाटेगाव येथील नारायण औटे यांनी विद्यार्थ्यांना यशाला शॉर्टकट नसतो हे पटवून दिले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संदीप काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून आमचे कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी नेहमी सजग राहून सामजिक समतोल राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील. सदर कार्यक्रमप्रसंगी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांनी कू. आयेशा शेख, साक्षी जाधव, राजश्री कातबने, आदित्य जाधव आपले मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन कु पूजा वाघमोडे या विद्यार्थ्यानी केले. महाविद्यालयाचे प्रा. अशोक गायकवाड, प्रा. साईनाथ भिसे, प्रा. उद्धव ताठे, प्रा. चंद्रशेखर साळवे, प्रा.श्रीमती मनीषा पाचारने, प्रा. श्रीमती स्वाती धुमाळ, श्री अजय सातपुते, श्री उमेश जाधव कार्यक्रमास उपस्थित होते.