परीपाठ /पंचाग /दिनविशेष

0


सौ सविता देशमुख . उपशिक्षिका पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय, पाडळी ता – सिन्नर जि नाशिक मो . ९९७०८६00८७

_*❂ 📆दिनांक :~ 26 जुलै 2023 ❂*_

    ❂🎴 वार ~ बुधवार 🎴❂

      _*🏮 आजचे पंचाग 🏮*_
━═•●◆❃★❂★❃◆●•═━

श्रावण. २६ जुलै
तिथी : शु. अष्टमी (बुध)
नक्षत्र : स्वाती,
योग :- साध्य
करण : बव
सूर्योदय : 06:01, सूर्यास्त : 07:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🖊️सुविचार 🖊️
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💡द्वेष,विरोध, चर्चा किंवा बदनामी हे सगळ भोगल्या शिवाय दिगग्ज घडत नसतात. त्या साठी जगण्याचं सामर्थ्य लागत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
म्हणी व अर्थ

📌गळ्यातले तुटले ओटीत पडले.

🔍अर्थ:-
कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 दिनविशेष 📆

🇮🇳कारगिल विजय दिवस
🍾राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन

🌞या वर्षातील🌞 207 वा दिवस आहे.

_*📕 महत्त्वाच्या घटना 📕*_

👉१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.
👉१८७६: ब्रिटीश कालीन भारतातील कलकत्ता शहरात इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली होती.
👉१९०२: कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
👉१९९८ : १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान
👉१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
👉२००५ : मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.
👉२००५: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने आपले अंतरीक्ष यान डिस्कव्हरी चे प्रक्षेपण केले.
👉२००८ : अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.

_*💐जन्मदिवस / जयंती💐*_

👉१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)
👉१८७५: कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (मृत्यू: ६ जून १९६१)
👉१८९३ : पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)
👉१८९४ : अल्डस हक्सले – ब्रिटीश लेखक व तत्त्वज्ञ तसचं, काल्पनिक कथा व कादंबरीकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
👉१८९४ : वासुदेव गोविंद मायदेव – “शिशुगीते” हा संगीताचा प्रकार मराठी भषेत रूळविणारे महान महाराष्ट्रीयन मराठी बालगीत कवी (मृत्यू: ३० मार्च १९६९)
👉१९०४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)
👉१९१४: प्रसिद्ध भारतीय कवयित्री विद्यावती कोकीळ यांचा जन्मदिन.
👉१९८५ : मुग्धा गोडसे – अभिनेत्री व मॉडेल

  _*🌹मृत्यू / पुण्यतिथी🌹*_

👉१८९१ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
👉१९६७: भारतातील प्रसिद्ध इतिहास, संस्कृत, कला आणि साहित्यांचे अभ्यासक व दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे सह-संस्थापक वासुदेव शरण अग्रवाल यांचे निधन.
👉२००९: भास्कर चंदावरकर – प्रसिद्ध भारतीय सितार वादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्य संगीतकार (जन्म: १६ मार्च १९३६)
👉२०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)
👉२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🥇सामान्य ज्ञान 🥇
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

👉भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
🥇वोमेशचंद्र बॅनर्जी

👉अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत?
🥇जो बायडन

👉समुद्राच्या पाण्याची सरासरी क्षारता किती आहे?
🥇3.5%

👉रामायण हा मूळ धार्मिक ग्रंथ कोणी लिहला?
🥇ऋषि वाल्मीकि

👉द्रौपदी मुर्मु ह्या देशाच्या कितव्या महिला राष्ट्रपती आहेत?
🥇दुसऱ्या महिला राष्ट्रपती
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📻 बोधकथा 📻

🙏सेवा🙏

गंगेच्या काठी गुरु अभेंद्र यांचा आश्रम होता. एकदा देशात भीषण दुष्काळ पडला, गुरु अभेंद्र यांनी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या तीन शिष्यांना बोलावून घेतले. व सांगितले,” अशा संकटाच्या वेळी आपण पीडितांची सेवा करायला पाहिजे. तुम्ही तिघे वेगवेगळे जावून उपाशी लोकांना अन्नदान करावे.” यावर शिष्य म्हणाले,”गुरुजी! आपण इतक्या लोकांना भोजन कसे काय देवू शकतो? आपल्याजवळ न अन्नाचा साठा आहे ना अन्न खरेदी करण्यासाठी धन.” तेंव्हा गुरु अभेंद्र यांनी त्या तिघांना एक थाळी देत म्हणाले,” हि दिव्य थाळी आहे. या थाळीजवळ तुम्ही जितके अन्न मागाल तितके ती देईल. तिन्ही शिष्य ती थाळी घेवून निघाले. दोन शिष्य एका ठिकाणी बसले, तिथून जो कोणी जाईल त्याला भोजन देत असत. परंतु तिसरा शिष्य मात्र गप्प बसला नाही तर उपाशी लोकांना शोधून शोधून भोजन नेवून देत राहिला. काही दिवसांनी तिघेही जेंव्हा आश्रमात परतले तेव्हा गुरुनी तिसऱ्या शिष्याची खूप स्तुती केली. पहिल्या दोघांना याचे आश्चर्य वाटले. ते म्हणाले,”गुरुजी! दुष्काळपीडितांची सेवा तर आम्हीपण केली आहे. मग तुम्ही तिसऱ्या शिष्याची विशेष स्तुती का करता आहात?” गुरु म्हणाले,” तुम्ही दोघेहि एका जागी बसून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करीत होता. असे केल्याने जे लोक तुमच्यापर्यंत पोहोचण्यास असमर्थ होते त्यांना तुमची सेवा मिळाली नाही. मात्र तिसऱ्याने लोकांना जागेवर जावून भोजन दिले त्याची सेवा किंवा मदत हि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याची सेवा हि स्तुतीलायक आहे.”

🧠तात्पर्य– खरी सेवा तीच असते जी पुढे होवून केली जाते व सर्व लोकांपर्यंत पोहोचते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✒️सेक्रेटरी :-बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था सिन्नर, जि. नाशिक.
✒️मुख्याध्यापक :- पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी, ता. सिन्नर. जि . नाशिक
✒️सचिव :- नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ. नाशिक
✒️समन्वयक :- नाशिक व अहमदनगर जिल्हा शिक्षण संस्थाचालक महामंडळ.
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here