जितेंद्र माने यांचा नागरी सत्कार संपन्न
सातारा : अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने यांनी येथील म.रा.वि.वि.कंपनी उपविभागात केलेल्या यशस्वी केलेल्या कार्याची दखल घेऊन विटा येथे बदली झाल्याने विशेष सत्कार निरोप समारंभानिमित्त येथील दिपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये घेण्यात आला.
येथील अ.भा.नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देवधर यांच्या हस्ते व विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अमित बारटक्के,अजित नवाळे व शिरीष चिटणीस व अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळाली पाहिजे. बेकायदेशीर विजचोरावर कारवाई झाली पाहिजे. सर्वानी मिळून राष्ट्रीय संपत्तीचे जतन केले पाहिजे. मानेसाहेब यांची बदली झाली असेल तरी पुन्हा पदोन्नतीने साताऱ्यात यावेत.अशा आशयाचे मनोगत अनिल वीर,शिरीष चिटणीस यांच्यासह मान्यरांनी व्यक्त केले.दिपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी सूत्रसंचालन केले.वि.ना.लांडगे यांनी आभार मानले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.