या चोरट्यांमुळे चाळीस हजार नागरिकांना पाच दिवस करावा लागला निर्जळीचा सामना देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे :
देवळाली प्रवरा नगर पालिकेने मुळा धरणावरुन थेट पिण्याचे पाणी योजना राबविली. सुमारे 14 कि.मी.योजना असुन या योजनेचे दोन चोरांनी एअर वाँल चोरण्याचा प्रयत्न केल्याने एअर वाँल पाईप लाईन मध्ये पडल्याने पाणी योजनेचे पाईप फुटल्याने दोन चोरांनी चाळीस हजार लोकसंख्येला गेल्या पाच दिवसा पासुन पाण्यापासुन वंचित ठेवले आहे. या दोन्ही चोरांना बेलापूर ता.श्रीरामपूर येथिल पोलीसांनी पकडून चौकशी केली असता दारु पिण्यासाठी पैसे नसल्याने एअर व्हॉल्व चोरल्याची कबुली पोलीसांसमोर दिली आहे.
देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या पाणी योजनेच्या पाईप लाईन वरील एअर वाँल रविवारी दिवसभरात चोरट्यांनी डाव साधला. एअर वाँल चोरताना चोरट्यांना एअर वाँल निघत नसल्याने दगडाच्या साहाय्याने एअर वाँल पाईप लाईनमध्ये पाडण्यात आले.त्यामुळे पाईप लाईन फुटली.देवळाली प्रवरा शहरासह वाड्यावस्त्यावर गेल्या सोमवार पासुन पाणी पुरवठा बंद झाला आहे.दोन चोरांनी चाळीस हजार लोकसंख्येला पाण्या पासुन वंचित ठेवले आहे.या दोन चोरांनी भागडाचारी पाईप लाईन योजने वरील दोन वाँल चोरल्याचे कबुल करुन दोन वाँल भंगारवाल्यास विकल्याचे कबुल केले आहे.भंगारवाल्या कडून दोन एअर वाँल जप्त केले आहे.
सोमवार दि.24 जुलै पासुन देवळाली प्रवरा शहरातील पाणी पुरवठा बंद झाला आहे.गेल्या पाच दिवसा पासुन पाणी योजना दुरुस्तीचे काम सुरु आहे.दुरुस्तीचे काम दिवसराञ सुरु असुन अखेर पाच दिवसा नंतर दुरुस्तीचे काम पुर्ण झाल्यावर कमी दाबाने जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी आणले आहे.चोवीस तासा नंतर पाणी साठले जाणार असल्याने शनिवारी सकाळी किंवा सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.
सोमवारी पाणी पुरवठा होणार नसल्याचे राञी उशिरा जाहिर केल्याने नागरीकांची पाण्यासाठी धावपळ सुरु झाली. पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी चार ते पाच दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सोमवारी दुपारी ध्वनीक्षेपकावरुन जाहिर केल्याने नागरीकांची पाण्यासाठी चलबिचल झाली. मुख्याधिकारी अजित निकत, कार्यालयीन अधिक्षक सुदर्शन जवक यांनी नागरीकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी मोकळे टँकर पालिकेस उपलब्ध करुन देण्यास आवाहन केले असता माजी नगरसेवक सचिन ढुस,अमोल कदम, विठ्ठल टिक्कल,निखिल जगताप,अकाश वाळूंज
आदींनी पिण्याचे पाणी वाटप करुन देण्यासाठी टँकर उपलब्ध करुन दिले. या टँकरद्वारे शहरासह वाड्यावस्त्यावर पिण्याचे पाणी टँकर द्वारे पुरविण्यात आले.त्यामुळे नागरीकांना मोठा धिर मिळाला. येथिल खांदे नामक शेतकऱ्यांने बोरवेल मधील पाणी टँकर भरण्यासाठी उपलब्ध करुन दिले.बोरवेलचे पाणी वापरण्यासाठी स्वतंञ टँकरद्वारे देण्यात आले.पाच दिवस पाणी योजना बंद राहिल्याने पाण्याचे महत्व नागरीकांना कळले आहे.
पाणी योजना दुर्स्तीचे काम चालू असताना मुख्याधिकारी अजित निकत कामावर तळ ठोकुन होते.त्याच दरम्यान मुख्याधिकारी निकत यांना पदोन्नती मिळाली त्यांची बदली अहमदनगर महापालिकेत उपआयुक्त म्हणून झाली.माञ निकत यांनी पदोन्नतीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करुन पाणी योजना दुरुस्तीकडे लक्षकेंद्रीत ठेवले.पाणी योजना दुरुस्त झाल्यावरच पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार स्वीकारले. सलग पाच दिवस पाणी योजना दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा विभाग प्रमुख अमोल दातीर,सुदाम कडू,दिपक वाळूंज,संतोष खेडकर,विजय साठे,अकिल शेख,गोकुळ बर्डे,अक्षय भालेकर,निळकंठ लगे,राजु शेटे,प्रकाश कदम,विश्वनाथ भांगरे,दानिश पठाण,महमंद शेख,पप्पु मुसमाडे,दिपक फुलारे,मुकेश डांगे,केतन शेरगिल,मुस्ताकभाई शेख,विकास गडाख आदींनी परीश्रम घेतले.
….त्या चोरांनी देवळालीकरांना पाण्याची किमंत समजवली!
देवळाली प्रवरा नगर पालिकेस मुळा धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेचे एअरा वाँल चोरल्याने पाणी योजनेची पाईप लाईन फुटली. त्यामुळे सलग पाच दिवस पाणी पुरवठा बंद राहिल्याने देवळाली प्रवरा शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी हाल झाले. अनेक वर्षा नंतर पाणी पुरवठा बंद राहिल्याने चाळीस हजार लोकसंख्येला त्या चोरांनी देवळालीकरांना पाण्याची किमंत काय असते ते चोरीच्या निमित्ताने समजवले आहे.