चांगतपूरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

0

पैठण,दिं.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील चांगतपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.

    यावेळी ध्वजारोहण उपसरपंच मुक्ताबाई गिते यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर  हूतात्म्यांना आदरांजलीची कोणशिला उभारून विर हूतात्म्यांना अभिवादन करण्यात आले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीसरात अमृत रोपवाटिका अंतर्गत १०१ वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जिम्मेदारी संबंधित शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच मेरी मिट्टी मेरा देश या अंभियांना अंतर्गत गावातील माजी सैनिकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित शिक्षक,  नागरिक, विद्यार्थी यांनी पंचप्रणची शपथ घेतली यावेळी उपसरपंच मुक्ताबाई गिते, ग्रामसेवक रमेश आघाव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक साईनाथ होरकटे,माजी समाज कल्याण सभापती रामनाथ चोरमले,माजी सरपंच उत्तमराव नलभे,माजी सैनिक पाटीलबा खाडे, अप्पासाहेब राख, रविंद्र कानडे, बाळासाहेब तट्टू,पोलिस पाटील जगन्नाथ माने, नवनाथ गिते, कृष्णा राजगुरू, तंटामुक्ती अध्यक्ष सिताराम चोरमले,अदित्य नलभे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण काळे, नवनाथ होरकटे,गोरख नवगिरे, सोमनाथ नवगिरे सह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक, विद्यार्थी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here