सातारा/अनिल वीर : पुन्हा येईन….याप्रमाणे गत वर्षी बिबट्याने सोनगाव परिसरात धुमाकूळ घातला होताच.तो गेला असे वाटत असताना पुन्हा त्याने यावर्षी मोर्चा वळवल्याने ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत.
गावठी कोंबड्याचा कुकुटपालन व घाण्याचे तेल हा व्यवसाय प्रविणचा आहे. गत वर्षी त्याचे नुकसान अनेकवेळा केले होते. शिवाय,समोरच रस्त्यावर हॉटेल मालक गाडीवरून जात असताना बिबट्याने पाठलाग केला होता.असे नानातर्हेचे प्रताप आहेत.त्यामुळे तो बिबट्या पुन्हा आल्याने भीतीचे वातावरण पसरलेले आहे.त्याने चार कोंबड्यावर झडप मारून फस्त केलेल्या आहेत.शिवाय, कुत्र्यावरही हल्ला करून चावा घेतला आहे.या सर्व गोष्टींमुळे प्रविनच्या घरातील लोकांनी आरडा-ओरड केल्याने गोंधळ झाल्याने बिबट्याने धूम ठोकली आहे. याबाबत वनखात्याशी भ्रणध्वनिवरून संपर्क साधूनही फोन उचलला गेला नाही.काय तत्परता म्हणायची ? तेव्हा वरिष्ठांनी चौकशी करून प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करावी.अशी मागणी होत आहे.