बाभुळगावला संतोष विद्यालयात विविध कार्यक्रमानी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
येवला, प्रतिनिधी :
आजच्या जीवनात विद्यार्थ्यांना नाविन्य व गुणवत्तापूर्ण गोष्टीच यशस्वी करू शकतात. त्यामुळे मिळालेल्या सर्वांगीण स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करत यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्याचा व गुणवत्तेचा ध्यास धरावा असे आवाहन जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक व माजी नगरसेवक रूपेश दराडे यांनी केले.
जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित संचलित बाभुळगाव येथे एस.एस.एम.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.या कार्यक्रमाला संस्थेचे जेष्ठ सचिव लक्ष्मण दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी संतोष विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, एसएनडी तंत्रनिकेतन,मातोश्री
बीएएमएस,बीएचएमएस तसेच नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी एसएनडी शैक्षणिक संकुलातील महाविद्यालयांच्या प्राचार्यच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.संचालक रूपेश दराडे यांनी ध्वजपूजन करून ध्वजारोहण केले,त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजगीत व राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली.भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने राष्ट्रप्रेमाने वातावरण दुमदमले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा प्राचार्य जी.एस.येवले यांच्या हस्ते सत्कार व स्वागत करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाच्या अभिवादनपर भाषणात संस्था सचिव लक्ष्मण दराडे यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे थोर समाजसुधारक,सैनिक,शेतकरी यांना अभिवादन करत देश विकासासाठी शिक्षण हा सर्वात चांगला सन्मानाचा मार्ग असून विद्यार्थ्यांनी सातत्याने शिकत रहावे असे प्रतिपादन केले.
स्वातंत्र्यदिना निमित्त विद्यालयाचा माजी विद्यार्थी सैनिक ऋषिकेश लोंढे यांचा सत्कार श्री.दराडे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.दहावीच्या विद्यार्थ्यींनींनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितींची मने जिंकली.बारावीचा विद्यार्थी राहुल पवार याने यावेळी देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी एस.एन.डी.पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य यु.बी.जाधव, बी.ए.एम.एस.कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन चांदोरकर, बी.एच.एम.एस.कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रुपा गायकवाड,नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नागराज,सैनिक ऋषिकेश लोंढे यांसह एसएनडी शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप पाटील,किरण पैठणकर यांनी केले.विभाग प्रमुख आप्पासाहेब कदम,विठ्ठल परदेशी आदींसह शिक्षकांनी नियोजन केले.