पैठण,दिं.२८.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील थेरगाव येथे वाटर ग्रिड योजने अंतर्गत उंच पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती एसपीएमएल एससीएल इन्फ्रा वाटर ग्रिड कंपनीचे अभियंता दिनेश राऊत यांनी दिली.
पैठण तालुक्यात वाटर ग्रिड योजने अंतर्गत धनगाव, बोरगाव,लिंबगाव,वडजी,हर्षी या ठिकाणी पाण्याच्या टाकीचे काम सुरू असून या टाकी मधून वाटर ग्रिड योजने अंतर्गत हर घर नल लोकांना स्वच्छ पाण्याचे पाणी मिळणार आहे सदरील कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू आहे.