सातारा/अनिल वीर : शहर परिसरातील शाहुनगर,गोळीबार मैदान आदी हद्दीतील मिळकतदारांना नगरपरिषदेने महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियम १९६५ अन्वये करयोग्य मूल्य निर्धारण नोटिसंबाबत नागरी संघटना,गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी व नागरिकांची बैठक घेण्यात यावी.म्हणुन जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
सातारा नगरपरिषदेने परस्पर करयोग्य मूल्य निर्धारण नोटीस स परिसरातील सर्व मिळकत धारकांना दिलेल्या आहेत / देत आहेत. या विषयी शहर परिसरातील नागरीकांच्या बैठकीमध्ये वरील नोटीसीबाबत चर्चा झाली. सदर मागणीच्या अनुषंगाने आक्षेप नोंदवण्यात आला आहे. तरी नगर रचना कायद्यान्वये शहर परिसर नियोजन विकास प्राधिकरण म्हणून शासनाच्यावतीने करयोग्य मूल्य निर्धारण प्रक्रियेत जिल्हाधिकारी यांनी लोकहितार्थ हस्तक्षेप करावा.शाहूनगरवासीय गोळीबार मैदान व शहर परिसरातील मिळकतदार वेळोवेळी शासनाचा कर भरत आहोत. तरी या भागातील नियोजन व विकासासाठी शासनाच्यावतीने आपण हस्तक्षेप करून या शहर परिसराचे नियोजन व विकासासाठी सहकार्य करावे. याकामी पुढील विषयांबाबत बैठक घ्यावी.सातारा नगरपरिषदेची अवैध हद्दवाढ आम्हा सातारा शहर पसिसरातील नागरिकांना मान्य नाही.जिल्हा नियोजन विकास प्राधिकरण म्हणून त्रिशंकू भागाच्या वरील विषयांच्या अनुषंगाने शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करावा. शाहूनगरवासीय,गोळीबार मैदान, शहर परिसरातील (त्रिशंकू) मिळकतदार वेळोवेळी शासनाचा कर भरत असल्याने नगरपषिदेची अवैध घरपट्टी भरण्यास मिळकतदारांचा विरोध आहे.शहर परिसरासाठी विकास प्राधिकरण निर्माण करावे. नगरपरिषदेची हद्दवाढ विधानसभेने मंजूर केली आहे अथवा नाही याचा खुलासा संबंधित कागदपत्रांसह करण्यात यावा.
.जिल्हाधिकारी यांना दि. ०५/१२/२०२२ रोजी पत्र देऊनही अद्याप कोणतीही बैठक न घेतल्यामुळे खुलासा झालेला नाही. तरी आपण तातडीने सातारा नगरपरिषद सातारा, नागरीक संघटना, गृहनिर्माण संस्था प्रतिनिधी आणि नागरिकांची बैठक आयोजित करावी.अन्यथा,नागरिकांना या संबंधी न्यायालयात दाद मागावी लागणार आहे.असेही निवेदनात म्हटले आहे.यावेळी विजय निकम,प्रा.दत्ताजीराव जाधव, संपतराव यादव,अस्लम तडसरकर,प्रा.विक्रांत पवार,हणमंतराव बर्गे,बाळकृष्ण देसाई,मोहन पवार,सी.अनिल, वामन जगनाथ,सतीश कांबळे, दीपक चव्हाण,पोपट फाळके, भरत निकम,उस्मान आतार, अनिल वीर,हिंदुराव पानस्कर, चिमाजी मोरे,शिवाजी देसाई, शशिकांत माने,लक्ष्मण पवार, भाऊसाहेब जगताप, युवराज जाधव,प्रल्हाद सावंत,राजेंद्र यादव,बबन करडे,रा.शामराव, परशुराम रसाळ,जमादार सूर्यवंशी,वाय.महादेव,भीमराव माने, विलास सावंत,विजयराव जाधव,प्रतापराव जाधव आदी नागरीक उपस्थित होते.