जिल्ह्यातून पुणे विभागीय स्पर्धेसाठी १४ विद्यार्थिनींची निवड
अहमदनगर :- रयत शिक्षण संस्थेचे, Radhabai Kale Women’s College’s राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील खेळाडूंनी अहमदनगर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहमदनगर आयोजित १७ व १९ वर्ष वयोगट (मुली) sword fight तलवारबाजी स्पर्धेत महाविद्यालयाने यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत खालील विद्यार्थीनींनी यश संपादन केले आहे. १७ वर्ष वयोगटात कु.संस्कृती काळे, कु.समृद्धी जामदार, कु.दिप्ती हिरणवाळे, कु.श्वेता गोडळकर, कु. प्राजक्ता थेऊरकर, कु. दिपाली गायके व १९ वर्ष वयोगटात कु.ऋतुजा म्हस्के, कु.सोनाली डुकरे, कु. वेदिका काळाने, कु.कोमल पांडूळे, कु.संस्कृती कांबळे, कु.वैष्णवी यादव, कु. प्रांजल लबडे, कु.ज्ञानेश्वरी होळकर या सर्व ११ वी च्या विद्यार्थिनी असून त्यांनी हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. यापूर्वी वरिष्ठ गटाने सुद्धा तलवारबाजीत सांघिक विजेतेपद प्राप्त केले होते.
या सर्व विद्यार्थिनींची सोलापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्वच क्रीडा प्रकारात महाविद्यालयाने यश मिळविले आहे. या यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन आमदार मा.आशुतोष काळे, सदस्य माजी आमदार अशोकराव काळे, सदस्या स्नेहलताई शिंदे, महाविद्यालय विकास समिती सदस्य, प्राचार्य डॉ.शंकर थोपटे, उपप्राचार्य डॉ.भूपेंद्र निकाळजे, व ज्युनियर विभाग प्रमुख प्रा.सतीश शिर्के आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, माजी विद्यार्थिनी आणि विद्यार्थिनीकडून सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विलास एलके यांचे मार्गदर्शन लाभले.