जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाची सखोल चौकशी करावी !

0

सातारा/अनिल वीर :  समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षामध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातून कोट्यावधीचा निधी परत गेलेला आहे. त्यामध्ये अनेक कामांना मंजूरी दिल्या जात नाहीत. त्यामुळे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत करण्यात येणारी विविध विकास कामे तसेच विशेष घटक योजनेतील जोड रस्त्यासाठी व समाज मंदिर दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या मंजूर या व तसेच यशवंत आवास घरकुल योजना या संदर्भात जो निधी येतो.याबाबत प्रस्ताव सादर होऊनसुद्धा फक्त त्याच्यावरती वजन न ठेवल्यामुळे ते प्रस्ताव मंजूर होत नाहीत.तेव्हा जिल्हा परिषफ समाज कल्याण विभागाची सखोल चौकशी करावी.

  संबंधित विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाचे याद्या किंवा त्याबाबत कुठल्याही प्रकारची जाहिरात केली नाही.दलित वस्तीचा निधी मंजूर करण्याकरता टक्केवारी मागितली जाते. त्याच पद्धतीने आंतरजातीय विवाहाचा निधी व दिव्यांगासाठी देण्यात येणारे साहित्य याबाबत सुद्धा उदासीनता दिसून येते. दिव्यांग लोकांसाठी जागृती करणे तसेच त्यांच्या इतर हक्काचे असलेले प्रकरणही वेळेत केली जात नाहीत. तसेच काही कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घरी वैयक्तिक कामासाठी ठेवून घरगड्यासारखी वागणूक दिली जात आहे. अशा बार्बीच्या अनुषंगाने समाज कल्याण अधिकारी उदासीनतेचे धोरण घेऊन आहेत. त्यामुळे फक्त जातीचा वापर करून अधिकाऱ्यावरती प्रेशर केले जाते. तसेच समाजातीलही लोकप्रतिनिधी किंवा संघटना पदाधिकाऱ्याला मानसन्माची वागणूक दिली जात नाही. समाजहिताच्या समाज कल्याण मधून राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनेबाबत कुठल्याही प्रकारे लोकप्रतिनिधी किंवा संघटना, पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते यांच्याशी विचार म्हणून केला जात नाही.समाज कल्याणचे कर्मचारी व अधिकारी उदासीन दिसून येत आहेत. तरी संबंधितांच्या सर्व विभागाची सखोल चौकशी करून त्याचे ऑडिट रिपोर्ट जाहीर करावा. दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावरती कडक कारवाई करावी. या मागणीसाठी येणाऱ्या काळात रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे व कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष मदन खंक्काळ यांनी दिला आहे. यावेळी किरण ओव्हाळ,अनिल बनसोडे,दादा गायकवाड,आनंदा गाडीवडार,सुनील ओव्हाळ,राजू शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here