सातारा/अनिल वीर : देशात आणि राज्यात सद्या निवडणूकांचे बिगूल वाजण्याचे संकेत मिळू लागल्याने सर्वत्र आघाड्यांच्या बैठकांचे वारे वाहू लागले आहे.त्यापार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही एनडीए व महाविकास आघाडीनेही बैठका सुरू केल्या आहेत.तेव्हा पुरोगामी सातारा जिल्ह्यात छ.शिवराय, फुले-शाहु-आंबेडकरी विचारांच्या विवीध संघटना व पक्ष आहेत. त्यांनीही एकत्रीत येऊन आगामी निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.त्यामुळे लवकरच एकत्रीत येऊन बैठक घ्यावी लागणार आहे.
निवडणूकामध्ये सहभागी होतात.अशा पक्ष संघटणांची लवकरच एक व्यापक बैठक बोलवण्यात येणार असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे रिपब्लीकन सेनेचे पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी दिली आहे. सद्या जिल्ह्यात एका बाजूला प्रतिगामी शक्ती आणि त्यांच्या मित्रपक्षामध्ये झालेल्या फुटी आणी नुकत्याच चार राज्यांच्या निवडनूकांच्या निकालामूळे एनडीएमध्ये जोश असल्याने ते हुकूमशाही पद्धतीने काम करताना दिसत आहे. याला विरोध करण्यासाठी दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी काम करत आहे. फक्त आणि फक्त प्रस्थापीत पक्षांनाच बरोबर घेऊन बैठका करताना दिसत आहेत. ते पक्ष पुर्वीच्याच अविर्भावात असल्याचे आढळून येत आहे. त्यांच्यात वास्तवाचा आभाव दिसतो आहे.तेव्हा या दोन आघाड्यांना सोडून छ.शिवाजी महाराज फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांची लोकशाही टिकावी. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटावेत. यासाठी सतत लढे देता देता लोकशाही प्रक्रीयेतही सहभागी होत असतात.आपला वेगळेपण जपत असतात. त्या सर्व पक्ष संघटणांना एकत्र बोलावून आजची प्राप्त परीस्थीतीची जाणीव करून सर्वांच्या हितासाठी आपण एकत्र येऊन निवडनूकांना सामोरे जाण्याबाबत विचार विनीमय केला जाणार आहे.
महाविकास आघाडी म्हणजेच इंडीया आघाडी फक्त आणी फक्त प्रस्थापीत सत्तेतीलच लोकांना बरोबर घेऊन छोट्या – मोठ्या अनूसुचीत जाती-जमाती,भटके-विमुक्त,ओबीसी,अल्पसंख्यंक,समाजांच्या प्रश्नावर लढणाऱ्या आणि निवडणुकामध्ये सहभागी होणाऱ्या पक्ष संघटनांना कोण्हीही विभक्त करू शकत नाही.तेव्हा प्रस्थापितांना बगल देऊन आपली स्वतंत्र बैठक घेऊन वेगळा पर्याय जनतेला देता येतो का ? याचा विचार विनीमय होणार आहे.