कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदी डॉ.नागनाथ पाटील

0

सातारा/अनिल वीर : महाबळेश्वर येथे होणाऱ्या दुसऱ्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात कथाकथन सत्राचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील यांची निवड झाली आहे. 

        मुक्त सृजन साहित्य पत्रिका, छत्रपती संभाजीनगर व गिरीस्थान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाबळेश्वर येथे दिनांक 21 व 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या दुसऱ्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होणार आहे. असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात यांनी जाहीर केले आहे.

प्राचार्य नागनाथ पाटील हे मराठीतील लेखक म्हणून सर्वश्रुत आहेत. सध्या श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय, वसमत येथे प्राचार्य म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या नावावर लंबाडी, कोंडणातलं जीणं,हुतराणी या कादंबऱ्या आहेत. रानभूल, मॅपको या कथासंग्रहाचे ते कथाकार आहेत.खोल डोहातील सावल्या, सावली हरवलेलं झाड या कवितासंग्रहाचे ते कवी आहेत. अर्वाचीन मराठी कविता या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे. १३  विद्यार्थ्यांना पीएचडी साठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. नरहर कुरुंदकर पुरस्कार,वारणेचा वाघ पुरस्कार, कैलास पब्लिकेशन चा चिखलठाणकर पुरस्कार असे दहापेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात कोंडणातलं जीणं या कादंबरीचा समावेश झालेला होता. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष होते. तसेच अधिसभा विद्या परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. बरबडा येथे भरलेल्या तिसऱ्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अशा एका गुणी लेखकाची कथाकथनाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर सदर सत्रात भास्कर बडे लातूर, मेघना साने ठाणे,राजेंद्र भोसले सोलापूर,अनिल शेवाळकर हिंगोली, रंजना सानप मायणी व नागू वीरकर कल्याण हे कथाकथन करणार आहेत.

सदर बैठकीला डॉ.महेश खरात, शिरीष चिटणीस,विनोद कुलकर्णी,प्राचार्य डॉ. चंद्रकांत कदम,प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, डॉ. संतोष देशमुख, प्रिया धारूरकर, प्रदीप पाटील, डॉ.संदीप श्रोत्री , संध्या चौगुले, डॉ. शशिकांत पवार डॉ.निलेश देगावकर,डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ, डॉ. बाजीराव शेलार, डॉ.शरद गोळे,दीपक बावळेकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here