सातारा/अनिल वीर : अकोला येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रुद्र निलेश शिंदे यांनी 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कांस्यपदक पटकावले आहे.
रुद्र शिंदे हा मेरी एंजल इंग्लिश मीडियम स्कूल आखाडे, ता. जावळी येथील विद्यार्थी आहे. त्याला सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे प्रशिक्षक सागर जगताप आणि रविंद्र होले तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, वर्ग आणि क्रीडा शिक्षक अनिकेत बोबडे यांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारकर, विविध क्षेत्रातील मान्यवर व बॉक्सिंगप्रेमींनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.