डॉ सचिन सोनी यांना सर्वोत्कृष्ट शस्त्रकिया पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

0

पैठण,दिं.९.(प्रतिनिधी): गुजरात येथे पार पडलेल्या 39 व्या पश्चिम विभागीय किडनी तज्ञाच्या परिषदेत डॉ सचिन सोनी यांना सर्वोत्कृष्ट शस्त्रकिया पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचा पैठण येथील शिक्षक विशाल पाटील तिखे,मिरा पाटील तिखे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

  राजकोट ,गुजरात येथे पार पडलेल्या 39 व्या पश्चिम विभागीय किडनी तज्ञाच्या परिषदेत डॉ,सचिन सोनी यांना सर्वोत्कृष्ट शस्त्रकिया पुरस्कार देण्यात आला,डॉ सचिन सोनी यांनी नाविन्यपूर्ण ए व्हि फिस्टूला या विषयावर आपले सादरीकरण केले होते या परिषदेत सुमारे 200 किडनी विकार तज्ञानी सहभाग नोंदवला होता, आता पर्यंत हजारो किडनी पेशंटवर डॉ सोनी यांनी उपचार केले आहेत,तसेच किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत ,किडनी स्पेशालिस्ट म्हणून डॉ  सोनी हे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत त्यांचे निदान व उपचार पद्धतीमुळे त्यांच्या कडे  महाराष्ट्रातून पेशंट येत असतात,ते पेशंटशी खूपच आस्थेने व आपुलकीने वागतात त्यामुळे त्यांचे व पेशंटचे एक जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. किडनी प्रत्यारोपण झालेले रुग्ण तर त्यांना देवतुल्यच मानतात डॉ सोनी यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here