पैठण तालुक्यातील ईसारवाडी,पाचलगाव, शेकटा येथे शेतीशाळा संपन्न

0

पैठण,दिं.१७.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील ईसारवाडी,पाचलगाव, शेकटा येथे मोझॅक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व एस. एम. सेहगल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार(दिं.१६) रोजी कृषी ज्योती  प्रकल्प अंतर्गत गहू व कांदा पिकाचे प्रात्यक्षिके बाबत शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती .

   या प्रशिक्षणासाठी एस. एम. सेगल फाउंडेशन चे योगेश शिनगारे (म. रा.प्र. समन्वयक )यांनी प्रकल्पात चालू असलेल्या  विविध उपक्रमा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच रब्बी हंगामातील कांदा, गहू पिकांबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या प्रसंगी लहू ठोंबरे यांनी कांदा पिकाचे खत व्यवस्थापन सूक्ष्म अन्नद्रव्य यांचे नियोजन कार्य व महत्व सह अवकाळी पावसापासून कांदा , गहू व इतर पिकाचे काळजी घेण्याचे  नियोजन शेतकऱ्यांना समजावून सांगितले कार्यक्रमाचे संचालन शिवहरी आंधळे यांनी केले यावेळी  गावातील शिवाजी भवर, दिलीप भवर , किरण भवर, कृषी सहाय्यक कुसळकर,भगवान भवर मनोहर बोंबले, विशाल बोंबले, तुकाराम महालकर,गणेश बोबडे,गणेश पाचोडे, गणेश राजने, विजय बोबडे, सुनील बोबडे सह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here