दोन दशकांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी दिला आठवणींना उजाळा

0

दोन दशकांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी दिला आठवणींना उजाळा

सातारा/ प्रतिनिधी- Friends who met after two decades remin

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत सातारा जिल्ह्यात एकमेव कार्यरत असलेले बोरगाव, ता. सातारा येथील  कृषी विद्यालय येथे सन 2003 -05 मधील बॅचच्या विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा संपन्न झाला. सुमारे वीस वर्षांनी गाठभेट झालेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देत हा स्नेह मेळावा यशस्वी केला.

  सोशल मीडियाच्या जमान्यात जुन्या मित्र-मैत्रिणींना शोधून काढणे सोपे झाल्याने 2003 -05 च्या बॅचमधील सुनिता साळुंखे अमोल घोरपडे अभिजीत शेवाळे सुमित पाटणकर अमित फिरंगे समाधान केंजळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे ठरवले त्यानुसार संबंधित सर्व माजी विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप करण्यात आला व त्यानुसार 23 मार्च रोजी सर्वांनी एकत्रित येण्याचे ठरवले. तत्कालीन शिक्षक प्रा. डॉ. बालगुडे, प्रा. चांगदेव काटकर, प्रा. जयसिंग डफळे, प्रा. सदाशिव डफळे, प्रा. जाधव यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा झाला. अमित फिरंगे अतुल वाघमारे समाधान केंद्रे नीलम पिसाळ शितल घोरपडे यांनी शिवप्रतिमा भेट देऊन मान्यवरांचे व उपस्थित त्यांचे स्वागत केले. 

माजी विद्यार्थ्यांपैकी अमोल बोबडे अमोल घोरपडे, गोकुळदास उदागे, नीलम पिसाळ, कल्पना जगताप, सुनिता साळुंखे, रूपाली कांबळे यांनी आठवणींना उजाळा देणारी मनोगते व्यक्त केली.

 सौ  सीता मोहिते यांनी सर्वांना भेटवस्तू देत आभार व्यक्त केले. अमोल घोरपडे व गोकुळदास उदागे यांनी सूत्रसंचालन केले. सुमित पाटणकर, दीपक गुरव, समाधान केंजळे, गोकुळदास उदागे यांनी स्नेह भोजनाची व्यवस्था केली होती. सुमारे वीस वर्षानंतर झालेल्या या भेटीत प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या करियर व संसारिक प्रगतीचा आढावा घेतला व जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा भेटण्याचे ठरवत स्नेह मेळाव्याची सांगता झाली.

*इमारतीच्या दुरावस्थेने अस्वस्थता* 

बोरगाव कृषी विद्यालयाची इमारत सध्या जिरनावस्थेत असून विद्यालयाच्या दुरावस्थेने माजी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपले ज्ञानमंदिर सुस्थितीत असावे या इमारतीचा जिर्णोद्धार व्हावा अशी अपेक्षा यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ज्या शाळामाऊलीने आपल्यावर सुसंस्कार केले, करिअरला नवी दिशा दिली, त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी योगदान देण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here