शिस्त लावणाऱ्या क्रेनकडूनच दुचाकीचे नुकसान

0

सातारा शहरतील वाहतूक पोलिसांची मनमानी, बेपरवाई चव्हाट्यावर_  Damage to the bike from the disciplining crane itself

 *सातारा/ प्रतिनिधी* – वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी साताऱ्यात कार्यरत असणाऱ्या क्रेनवरील कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीवर कारवाई करताना संबंधित पोलीस व करारावरील अर्धवेळ कर्मचारी अरेरावी व बेपरवाई करत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून सोमवारी दुपारी खण आळी परिसरातून उचललेल्या एका इलेक्ट्रिक बाईकचे मोठे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आले आहे.

      याबाबत अधिक माहिती अशी की सातारा शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सम -विषम पार्किंग पद्धत अंमलात आणण्यात आली आहे. या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई वाहतूक शाखेतर्फे करण्यात येते. याबाबत संबंधित विभागाच्या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या क्रेनद्वारे चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली दुचाकी वाहने वाहतूक शाखेच्या रविवार पेठेतील कार्यालयाच्या प्रांगणात नेण्यात येतात. तर चार चाकी वाहने जामर लावून जागेवरच लॉक करून ठेवली जातात. मात्र सोमवार दिनांक 25 रोजी दुपारी खण आळी परिसरात उभी असलेली एका नागरिकाची इलेक्ट्रिक बाईक वाहतूक नियमांचा भंग केल्याने उचलण्यात आली. मात्र रस्त्यावरून ती गाडी क्रेनमध्ये ठेवताना बेफिकिरीने गाडी उचलण्यात आल्याने संबंधित गाडीचे मोठे नुकसान झाले आहे या गाडीच्या हेडलाईट जवळील कंट्रोल युनिट तुटून पडले होते. वाहतुकीचे नियम तोडल्याने कारवाई करण्यास कोणाचीच हरकत असायचा प्रश्न नाही, मात्र ठेकेदारी पद्धतीने कामावर असणाऱ्या मुलांकडून कोणतीही दक्षता न बाळगता दुचाकी उचलण्यात आल्याने गाडीच्या हेडलाईट जवळील कंट्रोल पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी 9585 क्रमांकाच्या क्रेनमध्ये श्री. पिसाळ नावाचे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते. याबाबत तक्रार केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जात असून संबंधित दुचाकी कर्मचाऱ्याने उचलल्यानंतर आवाज देत असूनही, दुचाकी मालकाच्या तक्रारीकडे व आरड्याओरडयाकडे  लक्ष देत नव्हते. अक्षरशः त्या क्रेनमागे संबंधित दुचाकी मालक धावत होता. मात्र तरीही संबंधित क्रेन थांबली नाही. वाहतुकीला शिस्त लावणे सोपे असले तरी त्याची अंमलबजावणी करणारे लोक अत्यंत बेफिकिरीपणे काम करत आहेत. दुचाकीच्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न दुचाकी मालकासह त्यांच्या कुटुंबीयांतुन होत आहे. वाहतुकीचे नियम अनावधानाने पाळले न गेल्याने वाहनाची मोडतोड होण्याइतकी मगरूरी बाळगणाऱ्या क्रेनवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.

*मोक्याच्या पॉईंटवर मर्जीतील कर्मचारी* 

वाहतूक पोलिसांची सातारा शहर व परिसरातील मनमानी अनेकदा चव्हाट्यावर आली असली तरी, सातारा शहर वाहतूक शाखेचे प्रमुख अभिजीत यादव यांचा ढिसाळ व नियोजनशून्य कारभारच त्यास  कारणीभूत ठरत आहे. महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी मर्जीतले कर्मचारी नेमून आर्थिक कमाई वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा सातारा शहरात दबक्या आवाजात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here