स्नेही होळी, वृक्षारोपणसह संवर्धन कार्यक्रम संपन्न

0

सातारा/अनिल वीर  : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे येथील मध्यवर्ती कार्यालयासमोर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.याशिवाय, वृक्षसंवर्धनार्थ झाडांना पाणी घालणे हा कार्यक्रम मंगळाई पायथा,किल्ले अजिंक्यतारा व अन्य ठिकाणी संपन्न झाला. वाढे,ता.सातारा येथे पर्यावरण स्नेही मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.होळीची पोळी करू दान व बाळगू विवेकाचे भान याप्रमाणे आयोजन करण्यात आले होते. Snehi Holi, conservation program complete with tree plantation

    सदरच्या कार्यक्रमास डॉ.हमीद दाभोलकर (अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य),प्रशांत पोतदार(अंनिस राज्य कार्यकारिणी सदस्य), डॉ.दिपक माने(अंनिस सातारा शाखा), शशिकांत सुतार(अंनिस सातारा शाखा) तसेच भगवान रणदिवे, ऍड.हौसेराव धुमाळ, प्रकाश खटावकर आदी अंनिसच्या कार्यकर्त्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकर,कार्यकर्ते व वृक्षप्रेमी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here