सातारा : सेविनिवृत्तीनतंर नित्यनियमाने व्यायाम, आहार-विहार व जीवनशैली यावर नियंत्रित असे लक्ष्य केंद्रित केले पाहिजेत.असे आवाहन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले.
येथील शिवतेज हॉल येथे सेवानिवृत्त पोलीस बहूउद्देशीय संसंस्थेतर्फे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात,”जीवन व मार्गक्रमण” या विषयांवर अनिल वीर मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, “समाजाला सुरक्षा देणारे पोलीस खाक्याबद्धल समाज कायमच सलाम करेल.त्यांनी पोलिसमित्र म्हणून निवृत्तीनंतरही कार्यरत राहिले पाहिजे.” असे सांगून यांनी दैनंदिनी व आनंदी जगण्याच्या टिप्स दिल्या.
कार्याध्यक्ष सूनिलकूमार काबंळे यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालनही त्यांनीच केले. यावेळी उपाध्यक्ष अशोक निकम,कार्यवाह गौसपाक लाडंगे,सदाभाऊ वायदंडे, व्यवस्थापक राजेद्र शितोळे, सचिव नागेशराव घाटगे, खजिनदार हेमंतराव राक्षे, भिकाजीराव डमकले, सचांलक जयंतराव कूलकर्णी,नविन सचांलक उत्तमराव सोनावणे, ज्ञानेश्वर जाधव,श्रीरंग इगंळे व मान्यवर सभासद उपस्थित होते. मोहनराव कदम व लक्ष्मणराव नलवडे यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून आदरांजली अर्पणलL करण्यात आली.
रेल्वे सघंटनेचे अध्यक्ष नदंकूमार शेलार यांनी 94 ची 12 व 24 वर्षानतंरची वेतनवाढ, 10 + 20 + 30 + या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.शिवाय,फॉर्म भरून घेण्यात आले.पदोन्नती मिळालेले व नूतन सचांलक उत्तमराव सोनावणे,श्रीरंग इगंळे, विजयराव तावडे व ज्ञानेश्वर जाधव यांचा सत्कार अनुक्रमे जयंतराव कूलकर्णी,सतिशराव साबळे, रमेशराव ढाणे,जे.आर. धूमाळ,भिकाजीराव डमकले, हेमंतराव राक्षे व पोपटराव शेंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी गजानन भिसे व चद्रकांत काळे यांचा सत्कार गौसपाक लाडंगे व सदाभाऊ वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आला.नागेशराव घाटगे, सतिशराव साबळे यांनीही मनोगत व्यक्त केली.नागेशराव घाटगे यांनी सरकारी दवाखान्यात घडलेला प्रकार कथन केला. सेवानिवृत्त बाधंवावर उपचार न केल्याबाबत जाब विचारला. त्यामुळे उपचार करणेस भाग पाडले. तसेच इथून पूढेही कूणालाही काहीही अडचण आल्यास तात्काळ सघंटनेकडे सपंर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.सघंटनेचे नदंकूमार तडाखे यांनी उत्कृष्ट गायनाचा उपक्रम राबविल्याने मान्यवरांच्या हसे सत्कार करण्यात आला. ओळखपत्राबाबतचे व पेंडीगबाबतचे अर्ज लाडंगे व घाटगे यांनी एकत्रित केलेले आहेत. ते पुढील कार्यवाही करणार आहेत. सदरच्या सभेस शेकडो सभासद उपस्थित होते. राष्ट्रगीतानतंर सागंता झाली. याकामी,अध्यक्ष आबासाहेब, कार्याध्यक्ष व संचालक यांनी अथक असे परिश्रम घेतले.