कोकिसरे येथे यात्रेनिमीत्त उद्या भव्य कुस्त्यांचे मैदान ,मोरणा विभागात यात्रांचा हंगाम सुरू  . 

0

पाटण  /प्रतिनिधी 

पाटण तालुक्यातील मोरणा विभागात सालाबादप्रमाणे ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम रविवार पासून सुरू झाला असून भागातील, आंबेघर, गोकुळ, कोकिसरे, आंब्रग, नाटोशी, कुसरुंड  आदी गावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा होणार आहेत. यात्रेनिमीत्त धार्मिक, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोकिसरे गावचे ग्रामदैवत श्री ज्योतीलिॅंग व नवलाई देवीची वार्षिक यात्रा सोमवार दिनांक 22 व मंगळवार दिनांक 23 रोजी संपन्न होत असून यात्रेच्या मुख्य दिवशी मंगळवारी कुस्त्यांचै भव्य जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

प्रथम बक्षीस 51 हजार, द्वितीय बक्षीस 41 हजार, तृतीय बक्षीस 31 हजार, चतुर्थ बक्षीस 21 हजार साठी नामांकित पैलवानांच्या कुस्त्या होणार आहेत. तसेच सोमवारी सायंकाळी 4 ते 11 वा.व मंगळवारी सकाळी 6ते9 वा. देवांचा छबिना होईल,  मनोरंजनासाठी महादेव मनवकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे,, तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमेटी, व ग्रामपंचायत कोकिसरे यांनी केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here