राष्ट्रीय युवक महोत्सव स्पर्धा एस. एम. जोशी महाविद्यालयाची शिवानी वाघ प्रथम

0

हडपसर प्रतिनिधी :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दि.२८ मार्च ते ०१ एप्रिल, २०२४ या कालावधीत पंजाब कृषी विद्यापीठ, फिरोजपूर रोड, लुधियाना, पंजाब येथे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय युवक महोत्सव’ स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील S.Y.BSc. या वर्गातील कु.शिवानी वाघ हिने वेस्टन सोलो सॉंग या प्रकारात  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आह़े. यापूर्वी तिने युवक महोत्सव आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये व विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर तिची निवड  पुणे विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल संघात झाली होती. 

तिने मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.किशोर काकडे यांनी तिचे अभिनंदन करीत तिला पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिने मिळविलेल्या यशामध्ये सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शिल्पा शितोळे,  उपप्राचार्य प्रा.संजय जडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, सांस्कृतिक समितीमधील सर्व सदस्य, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकांचे योगदान आह़े.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here