सातारा/अनिल वीर : जिल्हा वंचित बहुजन आघाडी आयोजित ठिकठिकाणी अन्याय-अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ भव्य निदर्शने धरणे आंदोलन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले.
बदलापूर येथील अल्पवयीन दोन लहानग्या चिमुरडीवर झालेला अत्याचाराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी ठरली आहे.याचबरोबर पुणे , लातूर , अकोला या ठिकाणीसुद्धा अश्याच पद्धतींचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. तसेच मुस्लिम धर्मगुरू महंमद पैगंबर यांच्या बाबतीत रामगिरी महाराज यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे.तसेच कोलकत्ता येथील डॉक्टरेट शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून निर्घुण खून करण्यात आला.अशा सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी भव्य निदर्शने धरणे आंदोलन करण्यात आले.निषेधार्थ घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई,महासचिव गणेश भिसे,उपाध्यक्ष संदीप कांबळे,शहराध्यक्ष मिलिंद कांबळे, योगेश कांबळे, प्रा. दत्तात्रय जाधव,अमोल गंगावणे आदी पदाधिकारी, युवा महासचिव सायली भोसले,द्राक्षा खंडकर व महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी, सर्व विंग व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.